
नवी दिल्ली येथे कार्डबोर्ड बॉक्सच्या थरांमध्ये लपवून घेऊन जात होता 15 लाखांचे विदेशी चलन; CISF कर्मचार्यांनी दिले कस्टमच्या ताब्यात…
नवी दिल्ली प्रतिनिधी
नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात लपवून 15 लाखाचे विदेशी चलन घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना सीआयएसएफ च्या कर्मचाऱ्यांनी पकडून कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत पुढील तपास कस्टमर अधिकारी करत आहेत
सतर्क सीआयएसएफ (CISF) कर्मचार्यांनी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्डबोर्ड बॉक्सच्या बाजूच्या थरांमध्ये लपवून ठेवलेले विदेशी चलन (अंदाजे रु. 15 लाख) घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पकडले. प्रवाशाला कस्टमच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबतची सर्व माहिती सीआयएसएफ यांनी आपल्या ट्विटरवर दिलेली आहे



