vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

देशातील 2.4 कोटी रेशन कार्ड रद्द; महाराष्ट्रातील 21 लाखहून अधिक बनावट व अपात्र शिधापत्रिकांचा समावेश

देशातील 2.4 कोटी रेशन कार्ड रद्द; महाराष्ट्रातील 21 लाखहून अधिक बनावट व अपात्र शिधापत्रिकांचा समावेश…

नवी दिल्ली प्रतिनिधी

शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली.

 

शिधापत्रिकाधारकांवर मोठी कारवाई करत सरकारने गेल्या काही दिवसांत सुमारे अडीच कोटी शिधापत्रिका रद्द केल्या आहेत. याबाबतची माहिती शासनाकडून देण्यात आली. राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ग्रामीण विकास आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती (Sadhvi Niranjan Jyoti) यांनी ही मोठी माहिती दिली.

महाराष्ट्रात 21लाखाहून अधिक शिधापत्रिका रद्द –

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीत, 2017 ते 2021 या पाच वर्षांत देशात डुप्लिकेट, अपात्र आणि बनावट 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकट्या बिहारमध्ये 7.10 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यादरम्यान उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 1.42 कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्यात 21.03 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.

 

यावेळी सरकारने पुन्हा एक मोठे पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA), रेशनचा लाभ घेतलेल्या 70 लाख कार्डधारकांचा संशयितांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. हा डेटा केंद्राने ग्राउंड व्हेरिफिकेशनसाठी राज्यांना पाठवला आहे. पडताळणीमध्ये, ज्यांची नावे यादीत समाविष्ट झाली आहेत ते NFSA अंतर्गत रेशन मिळण्यास पात्र आहेत की नाही हे शोधून काढले जाईल.

दरम्यान, अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, जर 70 लाखांपैकी निम्मेही नियमानुसार योग्य आढळले नाहीत तर त्यांची जागा रद्द करून नवीन पात्रांना संधी दिली जाईल. शिधापत्रिका रद्द केल्यानंतर त्यांच्या जागी नवीन पात्र नागरिकांची नावे जोडली जातात.

 

संबंधित पोस्ट

राज्यातील मराठवाड्यात वीज कोसळून एकूण 6 जणांचा मृत्यू, मृतांत मायलेकीचा समावेश…

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएने आकारलेले विस्तारित शुल्क रद्द करून भाडे दर कमी करावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यात: गोव्यातून विनापरवाना मद्य आणल्यास मोक्का, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाईंचा इशारा…

आरटीएल’मुळे विद्युत उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिलापूर येथील ‘सीपीआरआय’च्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या माध्यमातून दिव्यांगांना सेवा देऊन आत्मनिर्भर करणार – मुख्य सचिव राजेश अग्रवाल ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राऊंडटेबलचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta