vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, जामीनवर पुढील आठवड्यात सुनावणी

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्याचवेळी राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जालाही ईडीने शुक्रवारी प्रतिज्ञापत्राद्वारे तीव्र विरोध दर्शवला. या यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जवळपास दीड महिन्यापासून कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

 

मुंबई प्रतिनिधी

कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जवळपास दीड महिन्यापासून कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्याचवेळी राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जालाही ईडीने शुक्रवारी प्रतिज्ञापत्राद्वारे तीव्र विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर, राऊत यांच्या जामीन अर्जावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे

 

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या कथित मनी लाँड्रिंग गुन्ह्याच्या प्रकरणात ईडीने राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली. त्यांनी मागील आठवड्यात अॅड. विक्रांत साबणे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. त्याला ईडीचे सहाय्यक संचालक डी. सी. नाहक यांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल तीव्र विरोध दर्शवला.

 

संजय राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे राकेशकुमार वाधवान व सारंग वाधवान यांनी संगनमत करून गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात एक हजार ३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा केला. या घोटाळ्याशी संजय राऊत यांचाही घनिष्ठ संबंध आहे. यातून बचाव व्हावा या उद्देशानेच त्यांनी पडद्यामागे राहून काम केले. घोटाळ्यातून आलेल्या पैशांपैकी तीन कोटी २७ लाख ८५ हजार ४७५ रुपयांचा वापर करत संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केल्या आणि परदेशांत प्रवासही केला. त्यामुळे घोटाळ्याशी संबंध नसल्याच्या त्यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही’, असे म्हणणे ईडीने न्यायालयात मांडले आहे

संबंधित पोस्ट

सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात ९ हजार हिंदूंच्या उपस्थितीत ‘सनातन गौरव दिंडी’!सनातन धर्माच्या रक्षणार्थ संघटित होण्याचा हजारो हिंदूंचा निर्धार !* भगवे ध्वज, टाळ-मृदुंग घेतलेले वारकरी, रणरागिणींची स्वसंरक्षण प्रात्याक्षिके, पारंपारिक वेशभूषा, नऊवारी साडी नेसलेल्या सुवासिनी दिंडीचे आकर्षण !

vishwatmaklokswamivarta

धान-भरडधान्य खरेदीच्या शासकीय पोर्टलवरील नोंदणीस १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ-अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती…

राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, भाव जाणून घ्या …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नवी मुंबई, वाशी येथील सिडको ऑडिटोरियम येथे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित “नशामुक्त नवी मुंबई” अभियानाचे उद्घाटन संपन्न

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमेरिकेचे महावाणिज्यदूत माईक हँकी यांनी घेतली सदिच्छा भेट दावोस गुंतवणूक करार, उद्योग संधीसाठी केले अभिनंदन…

vishwatmaklokswamivarta