
राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, भाव जाणून घ्या …
नवी दिल्ली प्रतिनिधी
राज्यातील ग्राहकांना आज पेट्रोल-डिझेलने दिलासा दिला. भावात मोठी घसरण दिसून आली. तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती जाणून घ्या..
: जागतिक बाजारात ओपेक प्लस देशांनी मोठी खेळी खेळत कच्चा तेलाचे भाव वाढवले आहेत. आता या खेळीत चीन मोठी भूमिका निभावणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चीन इंधनाची मागणी वाढवू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. चीनची अर्थव्यवस्था कोविडच्या संकटानंतर पुन्हा उभारी घेत आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. आज क्रूड ऑईलमध्ये (Crude Oil) मोठी उलथापालथ झाली नाही. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सकाळीच भाव जाहीर केले. राज्यातील ग्राहकांना आज इंधनाने मोठा दिलासा दिला. भावात मोठी घसरण दिसून आली. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय आहे
कच्चा तेलाचा भाव काय
आज कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ नोंदविण्यात आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.92 प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) वाढ झाली. हा भाव 84.86 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. पेट्रोलियम कंपन्या सकाळी 6 वाजताच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात.
राज्यातील प्रमुख शहरातील भाव
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
अहमदनगर पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.96 रुपये प्रति लिटर
अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
औरंगाबाद 107.34 पेट्रोल आणि डिझेल 93.82 रुपये प्रति लिटर
जळगावमध्ये पेट्रोल 106.33 आणि डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.05 आणि डिझेल 92.60 रुपये प्रति लिटर
- लातूरमध्ये पेट्रोल 107.60 तर डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर
- नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
- नांदेडमध्ये पेट्रोल 108.33 तर डिझेल 94.79 रुपये प्रति लिटर
- नाशिकमध्ये पेट्रोल 106.53 रुपये आणि डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
- पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
- सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर



