
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा कंदील..
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारतामध्ये धावणारी ही तिसरी वंदे भारत ट्रेन आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून वंदे भारत एक्सप्रेस ला हिरवा कंदील गांधीनगर येथून दाखवण्यात आलेला आहे यावेळी भारतात धावणारी ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे यापूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेल्या आहेत सर्व सुविधायुक्त अशा या रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेष सुविधा असणार आहेत यावेळी गुजरातच्या गांधीनगर मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ला आज आज हिरवा कंदील दाखविण्यात आले यावेळी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांसह मोठ्या संख्येने यावेळी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती



