वांद्रे पूर्व येथील अरुणोदय वाकर्स असोशियन मार्फत ज्येष्ठ नागरिकाचा भेटवस्तू देऊन जाहीर सत्कार…
मुंबई प्रतिनिधी
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त अरुणोदय वोकस असोशियन तर्फे बांद्रा बीकेसी कलानगर येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार भेटवस्तू देऊन मार्गदर्शन करण्यात आले
अरुणोदय वॉकर्स तर्फे नऊ ज्येष्ठ रत्नांचा सन्मान दिनांक 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन निमित्त अरुणोदय वोकस असोशियन तर्फे बांद्रा बीकेसी कलानगर पूर्व जिओ मॉल च्या समोर मुंबईतील अंधेरी कुर्ला धारावी सांताक्रुज येथून येणाऱ्या 75 वर्षे पूर्ण झालेल्या नवरत्न ज्येष्ठांचा सन्मान प्रमुख मार्गदर्शक माननीय निळकंठ निरखंड दादा श्रीखंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नऊ ज्येष्ठ नागरिकांना पुष्पगुच्छ भेटवस्तू व स्वीट देऊन सर्वांसमोर सकाळी सात ते साडेआठ या वेळात सन्मानित करण्यात आले या सन्मानामध्ये विविध ठिकाणच्या जेष्ठामध्ये श्री अरविंद रिज बुड जयश्री चौधरी आत्माराम देवकर अशोक काळे देवराम पाटील सुनिता प्रभू सुभाष बासुरे आणि अरुण जगदाळे इत्यादी गेस्टांचा समावेश आहे कार्यक्रमात श्रीमती चौधरी श्री रिज बुड श्री देवकर श्री बासुरे यांनी अल्पशा शब्दात अनुभव कथन केले यावर सभाध्यक्ष निळकंठ दादा श्रीखंडे यांनीही आपले विचार मांडून आशीर्वाद दिला कार्यक्रमाचे नियोजन सहसचिव ज्येष्ठ कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर व अंजली रिज बुड यांनी केले होते कार्यक्रमाच्या यशस्वी साठी सचिव किरण भोगले भारती शहा भारती पोळ सुधाचुरी मंगेश खरटमल नवनाथ पाखरे यांनी उत्तम सहकार्य केले शेवटी अल्पोहर देऊन कार्यक्रमाची समाप्ती केली