
बाळासाहेबांची शिवसेना’ नावाला ठाकरे गटाचा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला मिळालेल्या नावावर आक्षेप घेतला आहे, कोर्टात जाण्याच्या तयारीत…
मुंबई प्रतिनिधी: शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे गटाला नवीन नावे दिली आहेत. उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’ असे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव मिळालं आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा हा पहिला विजय असल्याच्या प्रतिक्रिया त्यांच्या समर्थकांकडून देण्यात येत आहेत.
दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाला मिळालेल्या नावावर आक्षेप घेतला आहे.
एकनाथ शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे म्हणाले की, बाळासाहेबांच नाव त्यांना घ्यावं लागलं, त्यावरं आमचा आक्षेप असा आहे की, यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा आधिकार नाही. शिवसेना प्रमुखांच्या नावाशिवाय हे काही यशस्वी होऊ शकणार नाहीत. अनिल देसाई दिल्लीतच आहेत, ते दिल्ली हायकोर्टात ही केस मूव्ह करतील, असे खैरे म्हणाले. उद्या नव्याने याचिका दाखल करणार का असे विचारले असता उद्या बहुतेक होईल, त्यांचा प्रयत्न चालू असल्याचे खैरे म्हणाले.
बाळासाहेबांचं नाव त्यांनी (शिंदे गटाने) घेऊ नये असं आम्हाला वाटतं कारण ते उद्धव ठाकरेंचे बाळासाहेब आहेत. त्यांना तुम्ही घेता कशाला असेही खैरे म्हणाले. निवडणूकांसाठी जोरदार तयारी करू असेही खैरेंनी सांगितले.
ठाकरे पहिल्या प्रयत्नात जिंकले…ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव म्हणाले की “पहिल्याच प्रयत्नात उद्धव ठाकरे जिंकले आहेत. कारण ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना’ या नावाची आम्ही मागणी केले होती तेच नाव आम्हाला मिळाले आहे.तर आम्ही ज्या चिन्हांची मागणी केली होती त्यापैकीच चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पहिल्याच प्रयत्नात जिंकले आहेत. या निर्णयावर आम्ही आनंदी आहोत, समाधानी आहोत, तर बाळासाहेब ठाकरे हे नाव चोरण्याचे काही लोकांनी प्रयत्न केला परंतु ते झाले नाही. आशी प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.



