भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा, व्हिडिओ व्हायरल..
भोपाल प्रतिनिधी
एका मुलाने अश्लील कमेंट करून तिची छेड काढल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. गोंधळ घातल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थिनीसोबत छोडछाड केल्याच्या आरोपावरुन भोपाळ येथील माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचे दोन गट आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका मुलाने अश्लील कमेंट करून तिची छेड काढल्याचा आरोप मुलीने केला आहे. त्यानंतर हा वाद विकोपाला गेला. गोंधळ घातल्याप्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठातील विद्यार्थी नसलेल्या काही बाहेरील व्यक्तींचाही या लढाईत सहभाग असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. कॅम्पसमध्ये झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही गटांना शांत केले. चार विद्यार्थ्यांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.