vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, लोकल वाहतुकीस अर्धा तास विलंब, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड, लोकल वाहतुकीस अर्धा तास विलंब, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी…

मुंबई प्रतिनिधी

मुंबई मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकल  गाड्या सुमारे 15 ते 30 मिनीटे उशीराने धावत आहेत. परिणामी कामावर जाणाऱ्या मुंबईकर प्रवासांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

 

मुंबई मध्य  आणि पश्चिम रेल्वे  मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या लोकल गाड्या सुमारे 15 ते 30 मिनीटे उशीराने धावत आहेत. परिणामी कामावर जाणाऱ्या मुंबईकर प्रवासांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

प्राप्त माहितीनुसार कल्याणहून सीएसएमटी अशा अप मार्गाने जाणाऱ्या गाड्या विशेष धिम्या गतीने धावत आहेत. त्यामुळे अप मार्गावरील काही गाड्या रद्दही करण्यात आल्याचे समजते. परिणामी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. डाऊन दिशेने कसाऱ्याकडे जाणारी मालगाडी उशीराने धावल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सिग्नल यंत्रणेत बिगाड झाल्याने रेल्वे विलंबाने धावत असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे पश्चिम रेल्वे मार्गावरही अंधेरी- जोगेश्वरी स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याचे समजते

 

लोकल गाड्या अचानक उशीरा धावू लागल्याने प्रवाशांना प्रवाशांचा खोळंबा झाला. बराच वेळ जाऊनही लोकल ट्रेन वेळेत न आल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढत आहे. तांत्रिक बिघाड दूर करुन शक्य तितक्या लवकर वाहतूक पूर्ववत करण्याचा रेल्वे प्रशासानाचा प्रयत्न आहे. त्यामुळे बिघाड कधी दुरुस्त होणार आणि वाहतूक पूर्ववत होऊन आपल्या निश्चित प्रवासासाठी कधी निघणार याची वाट प्रवासी पाहात आहेत.

संबंधित पोस्ट

सावित्री नदीच्या पात्रातील गाळ काढण्याची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी निधी देण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे निर्देश

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

vishwatmaklokswamivarta

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातर्फे अकोला येथे तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन,शिवार फेरीचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा-कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणाचे शेतकऱ्यांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

द काश्मीर फाइल्स चित्रपटाचा सत्तेतील लोकांनी प्रचार केला हे दुर्दैवी आहे – शरद पवार राष्ट्रवादी पार्टी अध्यक्ष

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३१ मे २०२५ रोजी ३०० वी जयंती आहे. याच निमित्ताने त्यांचे कार्य आणि विचारावर आधारित विशेष लेख !

वाल्ह्याच्या जिल्हा परिषद शाळा प्रश्न मंजुषा-स्पर्धामध्ये तालुक्यात प्रथम

vishwatmaklokswamivarta