vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड शपथबद्ध…

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून डी. वाय. चंद्रचूड शपथबद्ध…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

मराठमोळे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड भारताच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध झाले आहेत.

मराठमोळे Justice DY Chandrachud भारताच्या सरन्यायाधीशपदी शपथबद्ध झाले आहेत. त्यांना दिल्लीत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून शपथ देण्यात आली आहे. पुढील 2 वर्ष चंद्रचूड सरन्यायाधीशपदी असणार आहेत. उदय लळीत यांच्याकडून हा कारभार आता चंद्रचूड यांच्याकडे आला आहे. ते 50 वे सरन्यायाधीश ठरले आहेत.

 

भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश यू यू लळित यांच्या निवृत्तीनंतर म्हणजेच आज न्यायमूर्ती चंद्रचूड भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. चंद्रचूड यांची नियुक्ती केली आहे.

तत्पूर्वी भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यूयू लळित यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय वाय चंद्रचूड यांची शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.

हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर, न्यायमूर्ती चंद्रचूड यांची वयाच्या ३९ व्या वर्षी वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त करण्यात आली. ते भारतातील सर्वात तरुण वकील बनले. यानंतर लगेचच, १९९८ मध्ये त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आली. वकीली करत असताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवला. तसेच त्यांनी मुंबई विद्यापीठातही अध्यापक (व्हिजिटींग) म्हणून काम केलं आहे.

 

न्यायमूर्ती चंद्रचूड यांची २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर तीन वर्षांत त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड हे सर्वाधिक काळ सेवा बजावलेल्या माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

vishwatmaklokswamivarta

मोताळा तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण; 16 एप्रिलला सोडत..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्हाधिकार्‍यांकडून नांदेड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची मानवंदनामहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पी.एन.पी. नाट्यगृह, अलिबाग या ठिकाणी दिनांक १६ व १७ आक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

vishwatmaklokswamivarta

आदर्शवत समन्वयातून कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वी पूरनियंत्रण