vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

रायगड जिल्ह्यात नदी पात्रात सापडली स्फोटकं…, मुंबई एटीएसचे पथकही घटनास्थळी..

रायगड जिल्ह्यात नदी पात्रात सापडली स्फोटकं…, मुंबई एटीएसचे पथकही घटनास्थळी..

मुंबई प्रतिनिधी

: मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यातील नदीजवळ काही संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. त्यात काही स्फोटक किंवा इतर कोणतेही ज्वलनशील पदार्थ असण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड एसपीसह स्थानिक गुन्हे शाखा आणि मुंबई एटीएसचे पथकही (Mumbai ATS) घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्याखाली सापडलेल्या संशयास्पद वस्तूंची चौकशी करण्यात येत आहे. (A suspicious object has been found near the river in Raigad district)

 

पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी

रायगडच्या पेणमध्ये मुंबई गोवा महार्गावरील नदी पात्रात सापडलेली स्फोटकं ही डमी असल्याची माहिती समोर आली आहेत. भोगावती नदीपात्रात बॉम्ब आढळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. स्फोटक सदृश वस्तू निकामी केल्यानंतर ती डमी असल्याचं निष्पन्न झालं. डमी बॉम्ब असल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. आता मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली असून, खोडसाळपणा कुणी केलाय का, याचा शोध पोलीस घेत आहे.

 

घातपाताचा कट? रायगडमध्ये जिवंत स्फोटकं सापडल्याने खळबळ

 

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीने स्फोटके एकमेकांशी जोडली गेली आहेत ते आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात नदीजवळ एक संशयास्पद वस्तू सापडली आहे. त्यात काही स्फोटक किंवा इतर कोणतेही ज्वलनशील पदार्थ असल्याचा संशय होता. मात्र, चौकशीनंतर तसे काहीही नाही, हे स्पष्ट झालेय.

संबंधित पोस्ट

31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीतकलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

फोन टॅपिंग केस प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना कुलाबा पोलिस स्टेशन मध्ये दुसर्‍यांदा जबाब

वसईत दिवसाढवळ्या हत्याकांड भररस्त्यात लोखंडी पाना डोक्यात घालून प्रेयसीची हत्या…

५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, चार आरोपींना अटक..

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात  वनविभागाकडून  वनविभागाची धाड; 4 लाखांच्या कच्च्या माल आरोपी अटक…