vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादीत लवकरच फाटाफुट, खासदार-आमदार भाजपात प्रवेश करणार;  असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

राष्ट्रवादीत लवकरच फाटाफुट, खासदार-आमदार भाजपात प्रवेश करणार;  असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे.

 

राज्य प्रतिनिधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळं त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. काही दिवस गेले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) मोठी फाटाफुट होणार आहे. त्यांचे अनेक खासदार-आमदार, नेते भाजप (BJP) आणि शिंदे गटात दाखल होतील, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  यांनी केला.

 

बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विरोधक सरकार पडणार असं वारंवार सांगत आहेत. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारबद्दल (Shinde-Fadnavis Government) काही ठिकाणी बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे राहिलेले आमदार, खासदार शिंदे गटात जावू नये म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खटाटोप सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी सत्तेत राहिली आहे. त्यामुळं त्यांचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. काही दिवस गेले की राष्ट्रवादीत मोठी फुटाफुट होणार आहे. त्यांचे खासदार-आमदार भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बावनकुळे पुढं म्हणाले, आमच्याकडं 164 चं बहुमत आहे. यापुढं जर बहुमत मागीतलं तर 185 चं बहुमत दिसेल. आता विरोधी पक्षांनी चिंता सोडावी, विरोधी पक्षाचं काम करावं. त्यांना चांगली संधी विरोधी पक्षात काम करायची मिळाली आहे. 2019 मध्येच ती मिळणार होती. मात्र, बेईमानीनं सरकार मिळवलं. म्हणून अडीच वर्षे सत्ता मिळाली. शिंदे-फडणवीस सरकार अनेक वर्षे सत्तेवर राहणार आहे. त्यामुळं आतातरी किमान दहा-वीस वर्षे विरोधी पक्षाचं चांगलं काम करावं, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

संबंधित पोस्ट

राजभवन येथे ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा,प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू – राज्यपाल रमेश बैस

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते १२ फेब्रुवारीला उद्घाटन १२ व १३ फेब्रुवारीला ग्रंथदिडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, चर्चासत्र व मार्गदर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ

७५० हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ला प्रारंभ!*अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात नाही; तर हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा !* – पू. रामगिरी महाराज, नगर

vishwatmaklokswamivarta

नाशिकमध्ये जोरदार पावसाचा तडाखा, बारावीपर्यंतच्या शाळांना आज सुट्टी जाहीर