vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

धारावी पुनर्विकास प्रकल्प पुन्हा चर्चेत, अदानी समूहासह राज्य सरकारकडे तीन निविदा दाखल

धारावी पुनर्विकास प्रकल्प पुन्हा चर्चेत, अदानी समूहासह राज्य सरकारकडे तीन निविदा दाखल…

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरएला (SRA) रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांकडून तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निवीदा धारावी पुनिर्विकास प्रकल्पासंदर्भात आहेत. यात अदानी समूह, नमन समूह आणि डीएलएफ कंपनीच्या निविदांचा समावेश आहे.

 

अशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावी या अत्यंत दाटीवाटीच्या परिसराचा पुनर्विकास करण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे. त्यासाठी राज्य सरकारने निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार,महाराष्ट्राच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणजेच एसआरएला (SRA) रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांकडून तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. यात अदानी समूह, नमन समूह आणि डीएलएफ कंपनीच्या निविदांचा समावेश आहे.

 

मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी नागरी नूतनीकरण आणि परिवर्तनशील उपक्रम म्हणून धारावी पुनिर्विकास प्रकल्प ओळखला जातो. हा प्रकल्प धारावीच्या 2.8 चौरस किलोमीटरवर पसरलेल्या विस्तीर्ण झोपडपट्टीचे एकात्मिक व्यावसायिक आणि निवासी टाउनशिपमध्ये रूपांतरित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस व्ही आर श्रीनिवास यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईचा कायापालट करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने सुरुवातीच्या टप्प्यांचा एक भाग म्हणून आम्ही काही निवीदा मागवल्या होत्या. या निविदांना प्रतिसाद देत तीन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. त्यांच्याकडून आम्हाला कोटेशन मिळाले आहे, असे श्रीनिवास म्हणाले.

 

 

संबंधित पोस्ट

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कालावधीत राज्य उत्पादन शुल्काची कारवाई*आतापर्यंत 70 गुन्हे नोंद*उत्पादन शुल्कचे चेकपोस्ट

माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठीसरकारी दरबारी पाठपुरावा,मात्र त्‍याकडे दुर्लक्ष केले जात असल्‍याची खंत..

vishwatmaklokswamivarta

राज्यात आज 2359 ग्राम पंचायत निवडणूकींचा निकाल..

vishwatmaklokswamivarta

शासकीय तंत्रनिकेतनच्या इमारत बांधकामांची कार्यवाही तत्परतेने करावी-सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण