vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जुनी पेन्शन योजना लागू करा जीएसटी भवनखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन

जुनी पेन्शन योजना लागू करा जीएसटी भवनखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी

वृत्तसेवा पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र वस्तू कर व सेवा कर कर्मचारी संघटनेच्या वतीने माझगाव येथील महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कार्यालयाखाली अधिकारी व कर्मचारी यांनी आंदोलन केले. संघटनेचे नेते श्री मिलिंद सरदेशमुख यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले, एनपीएस ( नवीन अंशदान पेन्शन योजना) हटाव कर्मचारी बचाव , अरे आवाज दो हम एक है , कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही , मागणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जुनी पेन्शन लागु झालीच पाहिजे, अरे आवाज दो हम एक है, अशा प्ररकारच्या घोषणांनी जीएसटी परिसर दणाणून गेला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अनेक वेळा सरकारकडे निवेदने देऊन सुद्धा सरकारला पाझर फुटत नाही , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या ठरावानुसार एनपीएस हटाव ‘ या विषयाबाबत राज्यात जिल्हा व तालुकास्तरावर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान एनपीएस हटाव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या प्रमुख कार्यालयात कर्मचाऱ्यांची कार्यालय द्वारसभा आयोजित करण्यात आली आहे , तालुकास्तरावर एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी सदर तालुक्यातील कर्मचाऱ्यांना एकत्र करून एनपीएस हटाव’ मोहिमेचा प्रारंभ प्रचार आणि प्रसार केला जाईल तसेच नजीकच्या काळात बेमुदत संप यासारखे निर्णय देखील घेतले जातील असे मिलिंद सरदेसाई यांनी सांगितले. शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात 19 जानेवारी 2019 मध्येच अभ्यास गट समिती स्थापन केली होती. तथापि अजूनही समितीने आपला अहवाल सादर केलेला नाही यातून राज्यकर्त्यांची शासकीय कर्मचाऱ्यांप्रति उदासीनता दिसून येत आहे खरंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन म्हणजे जुनी पेन्शन लागू करणे हे गरजेचे आहे. राज्य सरकारचे हे आद्य कर्तव्य आहे आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद म्हणून पेन्शन आणि भविष्यात असावा हे नैसर्गिक न्याय तत्वाला धरून आहे आणि त्यासाठी नियुक्त म्हणून महाराष्ट्राचे राज्य सरकार जबाबदार आहे कर्मचाऱ्यांच्या वारंवार मागणी अंतिम राज्य सरकार याबाबत कोणत्याही प्रकारचे पावले उचलताना दिसत नाहीत, उलट दिरंगाई करताना दिसत आहे त्यामुळे याचा परिणाम म्हणून अख्ख्या महाराष्ट्रभर नवीन पेन्शन योजने विरोधात फार मोठे जन आंदोलन उभारले जात आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना आम्हाला तात्काळ लागू करावी , असे मिलिंद सरदेशमुख यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

शिवसेना भवनासमोर बर्निंग कारचा थरार, दादर मधील सेनाभवनासमोरील रस्त्यावर एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली

vishwatmaklokswamivarta

अत्यावश्यक सेवेतील 691 कर्मचाऱ्यांनी ठाण्यात केले टपाली मतदान

मुंबई महानगरपालिका निवडणुका : राज-उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला, जागावाटप

vishwatmaklokswamivarta

फळपिक विमा योजनेंतर्गत आंबिया बहारातील आंबा फळपिकासाठी सहभागाकरिता 30 नोव्हेंबर अंतिम मुदत..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील या भागामुंबईतील या भागात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णत: बंद; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

वसुंधरा दिनानिमित्त फेस कॉम ग्रुप ज्येष्ठांची निसर्ग उद्यानाला भेट…