vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील या भागामुंबईतील या भागात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णत: बंद; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

मुंबईतील या भागामुंबईतील या भागात 5 आणि 6 ऑक्टोबरला पाणीपुरवठा पूर्णत: बंद; पाणी जपून वापरण्याचे BMC चे आवाहन

 

मुंबई : प्रतिनिधी  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागातील परळ, काळेवाडी, नायगांव इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा अधिक सुव्यवस्थित करण्याकरिता काही तांत्रिक कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कामे योग्यप्रकारे होण्याच्या दृष्टीने मंगळवार, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपासून बुधवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत परिसरातील पाणीपुरवठा २४ तासांसाठी खंडित करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद असण्याच्या कालावधीत कालावधीत गोलंजी टेकडी जलाशयाच्या आतील परिसरातील ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचे व ४५० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची जोडणी करण्यात येणार असून ४५० मिलीमीटर व्यासाच्या २ जलवाहिन्या निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित करण्यात येणा-या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन BMC प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

पालिकेने प्रसिद्ध केलेली सविस्तर माहिती

अ) परळ गांव येथील गं. द. आंबेकर मार्ग ५० टेनामेंटपर्यंत, एकनाथ घाडी मार्ग, परळ गांव मार्ग, नानाभाई परळकर मार्ग, भगवंतराव परळकर मार्ग, विजयकुमार वाळिंभे मार्ग, एस. पी. कंपाऊंड या परिसरांना दररोज दुपारी १.४५ ते सायंकाळी ४.४५ या कालावधी दरम्यान पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

ब) काळेवाडी येथील परशुराम नगर, जिजामाता नगर, आंबेवाडी (भाग) साईबाबा मार्ग, मिंट वसाहत, राम टेकडी या परिसरांना दररोज रात्री ८.३० ते ११.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

क) नायगांव येथील जेरबाई वाडिया मार्ग, स्प्रींग मिल चाळ, गं. द. आंबेकर मार्ग, गोविंदजी केणी मार्ग, शेट्ये बाजार, भोईवाडा गांव आणि हाफकिन या परिसरांना दररोज सकाळी ७.०० ते १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येतो. तथापि, दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी हा पाणीपुरवठा करण्यात येणार नाही.

संबंधित पोस्ट

माहेर’ च्या रक्षाबंधनामुळे बहिणींच्या चेहर्‍यावर हास्य फुललेबंधुप्रेमाला पारखे झालेल्या बहिणींसाठी रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात महिला संवाद

जिल्हाधिकारी किशन जावळे यांची स्ट्राँगरुमला भेट

vishwatmaklokswamivarta

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी गावात ढग फुटी भीषण पूरस्थिती अनेक अनेक मृत्युमुखी तर अनेकांचा शोध सुरू घटनास्थळी प्रशासन तत्परतेने काम चालूच

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक मदत 15,000 रुपयांपर्यंत वाढवणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्ष- खोरीप मुंबई महानगरपालिका निवडणूक 20 26 करिता पक्षाच्या उमेदवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आढावा बैठक संपन्न