vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांकडून ‘राज्यपाल हटाव’ ची घोषणाबाजी…

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळाच्या पायर्‍यांवर विरोधकांकडून ‘राज्यपाल हटाव’ ची घोषणाबाजी…

 

नागपूर प्रतिनिधी

 

नागपूर येथील महाराष्ट्र शासन च्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या शेवटच्या हिवाळी अधिवेशनाच्या दिवशी येथे विधिमंडळाच्या पायऱ्यावर राज्यपाल हटावची मागणी करताना विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अजित पवार, अंबादास दानवे आदी आमदार होते.

 

नागपूर (Nagpur) मध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2022) आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधक पुन्हा आक्रमक होताना दिसले. मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांनी महापुरूषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा त्यांनी निषेध नोंदवला आहे. दरम्यान हात काळ्या टोप्या घेऊन आणि त्या भिरकावत विरोधक घोषणाबाजी करताना दिसले. यावेळी विरोधकांनी बॅनर हात धरत आणि बुजगावणी धरूनही घोषणाबाजी केली. ‘राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणा देताना आमदार दिसले

राज्यपाल हटावची मागणी करताना विधिमंडळाच्या पायर्‍यांवर अजित पवार, अंबादास दानवे आदी आमदार होते. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा सार्‍यांकडूनच यापूर्वी देखील निषेध नोंदवण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार मधील पक्षांनी एकत्र येत मुंबईत राज्यपाल हटावच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. आता आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले

हिवाळी अधिवेशनात अनेक गोष्टींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले होते. त्यानंतर झालेल्या गोंधळात एनसीपी प्रदेशाध्यक्ष आणि नेते जयंत पाटील यांच्यावर देखील कारवाई करत त्यांना या अधिवेशनासाठी असंसदीय शब्दाचा वापर केल्याचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. 

संबंधित पोस्ट

निबंध स्पर्धेमुळे भगवान महावीर यांचे जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचेल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

पुरीमध्ये चक्रीवादळ ‘मोंथा’चा परिणाम दिसू लागला आहे  जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे लाईफगार्ड आणि अग्निशमन विभागाने पर्यटकांना समुद्रकिनाऱ्याजवळ जाण्यापासून आणि समुद्रात अंघोळ करण्यापासून रोखले आहे. सर्वांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन. 

vishwatmaklokswamivarta

दक्षिण भारताच्या महायात्रेला माळेगावात उत्साहात प्रारंभ…

vishwatmaklokswamivarta

सोलापूर मधील पाच तालुक्‍यांसाठी कंटेन्मेंट झोन,सर्वाधिक रुग्णसंख्या  गावांमध्ये प्रभावी उपाययोजना केल्या जाणार, मुख्य अधिकारी दिलीप स्वामी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावासह ‘मशाल’ चिन्ह; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची तिन्ही चिन्हे फेटाळली, ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मात्र मिळाले

vishwatmaklokswamivarta

छत्रपती संभाजीनगर – पैठण महामार्गाच्या कामाला गती;अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले