vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती संभाजीनगर – पैठण महामार्गाच्या कामाला गती;अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

छत्रपती संभाजीनगर – पैठण महामार्गाच्या कामाला गती;अपूर्ण कामे लवकरच पूर्ण करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

मुंबई, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा ४२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गातील ३५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी विधान परिषदेत दिली.याबाबतचा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सदस्य विक्रम काळे यांनीही उपप्रश्न विचारले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले म्हणाले की, या रस्त्याचे काम सलग न झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण काही ठिकाणी वाढले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) रस्त्याखालील पाईपलाईनचे काम हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे काही अडथळे निर्माण झाले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाईपलाईनचे काम पूर्ण होईल.

सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावर रंबल स्ट्रिप्स, दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर बोर्ड आदी लवकरच बसवण्याच्या सूचना ‘एनएचआय’ला देण्यात येतील. तसेच छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाद टी पॉइंटचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीतील निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.”

संबंधित पोस्ट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी ला लागावे- ना.मंगलप्रभात लोढा

सातारा जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीत 2928 प्रकरणे निकाली*

vishwatmaklokswamivarta

पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी न करणाऱ्या अंगीकृत खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*महाराजस्व अभियानातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक*खारतळेगाव येथील पाणंद रस्त्याची पाहणी*जनता दरबारात नागरिकांची ८५ निवेदने स्विकारली.

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश! बिजापूरच्या नेशनल पार्क जंगलात झालेल्या चकमकीत 1 कोटींचं बक्षीस असलेला नक्षल कमांडर सुधाकर ठार.