
देशात सर्वत्र सत्तेचा गैरवापर वारंवार दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्रावर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्र प्रतिनिधी
सत्तेचा गैरवापर देशात सर्वत्र होत आहे, हे वारंवार दिसत आहे. आजपर्यंत असे कधी पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा कायम राखण्यासाठी पावले टाकले पाहिजेत, मात्र असे होताना दिसत नाही, असे म्हणत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केंद्रावर टीकास्त्र सोडले.
आजपर्यंत असे कधी पाहिले नव्हते. सत्ताधारी पक्षाने संसदेचा दर्जा कायम राखण्यासाठी पावले टाकले पाहिजेत, मात्र असे होताना दिसत नाही, असे म्हणत शरद पवार यांनी आज केंद्रावर टीकास्त्र सोडले.बारामतीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, विरोधकांना बोलू द्यायचच नाही, सभागृहात गोंधळ करायचा आणि त्या गोंधळातच विधेयक मंजूर करून घ्यायची, अशी सरकारची भूमिका असल्याचे चित्र समोर येत आहे, हे असे किती दिवस चालणार हे समजत नाही.आता मात्र या सर्वांचा विचार आम्हा सर्व विरोधकांना एकत्र बसून करावा लागेल
अनिल देशमुख यांच्या बाबतीत बोलताना शरद पवार म्हणाले, अनिल देशमुख, संजय राऊत यांना जामीनावर मुक्त करण्यात आले.
न्यायालयाने त्यात भूमिका घेतली, मात्र ज्या कारणांसाठी त्यांना तुरुंगात टाकले ते कारण किंवा त्यात काही नाही असाच निष्कर्ष न्यायालयाने काढलेला आहे. फक्त विरोधकांना घाबरवून सोडण्याचे काम यातून झाले असे दिसते आहे. अनिल देशमुख, नबाब मलिक, संजय राऊत यांना जी अटक झाली त्यातून सत्तेचा गैरवापर होत आहे, असेच चित्र पुढे येत आहे.दरम्यान शेतकरी ज्या दिवशी यशस्वी होईल त्या दिवशी व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात देशाला चांगले दिवस येतील असे ते म्हणाले. सत्ता कुणाची असली तरी देशाची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे आणि भारत हा एक उत्तम निर्यातदार देश म्हणून समोर यायला पाहिजे, राजकीय मतभेद बाजूला ठेवून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काम करायला हवे असे शरद पवार यांनी यावेळी



