vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

यंदा निर्बंधमुक्त ३१ डिसेंबर अर्थात्‌ नवीन वर्ष सोहळा उत्साहात साजरा करावयास मिळणार आहे

यंदा निर्बंधमुक्त ३१ डिसेंबर अर्थात्‌ नवीन वर्ष सोहळा उत्साहात साजरा करावयास मिळणार आहे.

 

मुंबई प्रतिनिधी

गेली दोन वर्ष नागरिकांना विशेषत: तरुणाईस कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या निर्बंधांमुळे नवीन वर्षाचा आनंद साजरा करता आला नाही.यंदा निर्बंधमुक्त ३१ डिसेंबर अर्थात्‌ नवीन वर्ष सोहळा उत्साहात साजरा करावयास मिळणार आहे. त्यामुळे अबालवृद्धांमध्ये अमाप उत्साह दिसून येत आहे. अशा पार्श्‍वभूमीवर सर्वच वयोगटातील नागरिकांचे नववर्षाच्या स्वागताचे जोरदार नियोजन सध्या सुरू आहे

 

नववर्ष स्वागताच्या नियोजनात पर्यटनालाही मोठे महत्त्व मिळत असल्याचे सर्वत्र बघावयास मिळत आहे. त्यातून शुक्रवार (ता. ३०) पासूनच नाशिकसह त्र्यंबकेश्‍वरलाही भाविक, पर्यटकांची गर्दी होत आहे. नवीन वर्षाचा उत्साह अर्थात्‌ ३१ डिसेंबर साजरा करण्यासंदर्भात सर्वांमध्ये आकर्षण असते.

मध्यमवर्गीय, तसेच तरुणाईमध्ये मात्र जास्त प्रमाणावर आकर्षण बघावयास मिळते. त्यातच, गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध होते. त्यामुळे सलग दोन वर्ष नवीन वर्षाचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करता आले नाही. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने निर्बंधमुक्त उत्साह साजरा करता येणार आहे. त्यामुळे तरुणाईंकडून विशेष तयारीस जोर आला आहे.दरम्यान, शनिवारी (ता. ३१) व रविवारी (ता. १) शासकीय कार्यालयांना सुट्टी असल्याने नवीन वर्ष साजरा करणाऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. शनिवारी उशिरापर्यंत जल्लोष केला तरी, रविवारी संपूर्ण दिवस आराम करावयास मिळणार आहे. काहींनी शनिवार, रविवारची सुट्टी आणि नवीन वर्षाचे औचित्य साधत पर्यटनाचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने त्यांना कुटुंबीयांसह वेळ घालवता येणार आहे. दुसरीकडे, शुक्रवारपासूनच मद्याच्या दुकानांमध्येही मद्यप्रेमींची गर्दी दिसून आली

दोन वर्षानंतर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांमधील उत्साह लक्षात घेता, पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, रात्रभर पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहेत.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत चौकांत, संवेदनशील भागात नाकाबंदी, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करणे, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, त्यांची तपासणी करणे याप्रमाणे नियोजन केले आहे. हॉटेल चालकांनीदेखील नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करत हॉटेलवर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार; खारघर सज्ज…

vishwatmaklokswamivarta

कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यासाठी कुरण निर्मितीस प्राधान्य- वनमंत्री गणेश नाईक

सार्वजनिक बांधकाम विभाग-भंडारा ते गडचिरोली ९४ किलोमीटरचा द्रुतगती महामार्गभूसंपादनासह अनुषंगिक ९३१ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता

vishwatmaklokswamivarta

आज जनता दल युनायटेड चे अध्यक्ष नितीश कुमार घेणार राष्ट्रवादी पार्टी अध्यक्ष शरद पवार यांची भेट, ‘या’ मुद्द्यावर करणार चर्चा

vishwatmaklokswamivarta

गरजुंपर्यंत प्रभावीपणे लाभ पोहोचवावा-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेचं कार्यालय सील,महाराष्ट्र विधानसभा येथील विधिमंडळातील