
टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स तिच्या उपकंपनीमार्फत फोर्ड इंडियाच्या प्लांट अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करणार .
व्यावसायिक प्रतिनिधी
Ratan Tata : टाटा समूहाची कंपनी टाटा मोटर्स तिच्या उपकंपनीमार्फत फोर्ड इंडियाच्या प्लांट अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, उपकंपनी टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी (TPEML) आणि फोर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (FIPL) यांच्यातील गुजरात-आधारित सानंद प्लांटच्या अधिग्रहणाची प्रक्रिया 10 जानेवारी 2023 रोजी पूर्ण होईल.
अधिग्रहण प्रक्रियेद्वारे टाटा मोटर्सला फोर्ड इंडियाची जमीन, इमारती, वाहन निर्मिती युनिट्स, यंत्रसामग्री आणि उपकरणे मिळतील.टाटा मोटर्सने स्टॉक एक्सचेंजमध्ये सांगितले की, या प्लांटची वार्षिक क्षमता 3 लाख युनिट्स आहे आणि 4,20,000 युनिट्सपर्यंत वाढवता येऊ शकते. या संपादन प्रक्रियेत, प्लांटमधील सर्व पात्र कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कायम राहतील.
90 च्या दशकात अमेरिकन कंपनी फोर्डने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. फोर्डने अनेक वर्षे भारतात नफा मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु यश मिळू शकले नाही.फोर्डने गाड्यांच्या मागणी घट, बाजारत इतर कंपन्यांची कमी किमतीची वाहने आणि महिंद्रासोबतचा अयशस्वी संयुक्त उपक्रम यासह अनेक कारणे सांगून भारतातून बाहेर पडण्याची योजना जाहीर केली होती.23 वर्षांपूर्वी फोर्ड कंपनीने टाटा मोटर्ससोबतचा करार रद्द केला होता. कार क्षेत्रातील अपयशानंतर रतन टाटा यांनी त्यांचा व्यवसाय विकायचा होता
या करारासाठी रतन टाटा फोर्ड मोटर्सच्या मुख्यालयात गेले असता अमेरिकन कंपनीच्या उच्च अधिकाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती.फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड म्हणाले की, जर मी या कार विभागाशी व्यवहार केला तर ते तुमच्यावर मोठे उपकार असतील. या अपमानासाठी रतन टाटांनी करार रद्द केला आणि टाटा मोटर्सची जाहिरात करण्यास सुरुवात केली.
एवढेच नाही तर रतन टाटा यांनी काही वर्षांनी फोर्डचे दोन लोकप्रिय ब्रँड जग्वार आणि लँड रोव्हरही कंपनीकडून विकत घेतले. आता पुन्हा एकदा टाटांनी या अमेरिकन कंपनीचा प्लांट भारतात विकत घेतला आहे.



