vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

उत्तराखंड येथील: जोशीमठ ‘सिंकिंग झोन’ म्हणून घोषीत, खचणारी जमीन आणि भेगाळलेल्या भींती

 उत्तराखंड येथील: जोशीमठ ‘सिंकिंग झोन’ म्हणून घोषीत, खचणारी जमीन आणि भेगाळलेल्या भींती…

 

उत्तराखंड प्रतिनिधी

उत्तराखंड राज्यातील जोशीमठ गावातील इमारती, मंदिरे जमीनीत खचू लागली आहेत. इमातींच्या भिंतीनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनांचे धक्कादायक वास्तव दाखवणारी छायाचित्रेही पुढे आली आहेत. इथे आम्ही त्यातील काही देत आहोत. पाहा हे धक्कादायक फोटो.

उत्तराखंड (Uttarakhand) राज्याच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा (Alakananda River) नदीच्या काठावर वसलेल्या जोशीमठ (Sinking Joshimath) हे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. प्रशासनाकडून हे गाव ‘सिंकिंग झोन’ (Sinking Zone) म्हणून नुकतेच घोषीत करण्यात आले.गावातील जमीन पाठिमागील काही दिवसांपासून अचानक खचू लागली आहे. त्यामुळे गावातील इमारती, मंदिरे जमीनीत खचू लागली आहेत. इमातींच्या भिंतीनाही मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व घटनांचे धक्कादायक वास्तव दाखवणारी छायाचित्रेही (Shocking Photos Of Sinking Joshimath) पुढे आली आहेत. इथे आम्ही त्यातील काही देत आहोत. पाहा हे धक्कादायक फोटो.

 

जोशीमठ येथील परिस्थितीचा आढावा घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जोशीमठ भूस्खलन आणि भूस्खलनामुळे बाधित रहिवाशांना तात्काळ मदत आणि बचाव सुनिश्चित करताना परिसरातील सर्व चालू विकास कामांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बाधित स्थानिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि परिसरातील सर्व विकास कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) हिमांशू खुराना यांनी नुकसानीच्या प्रमाणात मूल्यांकन करण्यासाठी बाधित भागात घरोघरी जाऊन पाहणी केली आणि ज्या घरांमध्ये भेगा पडल्या आहेत अशा रहिवाशांना मदत केंद्रात जाण्याचे आवाहन केले आहे. चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, जोशीमठ शहरातील 603 इमारतींना तडे गेले आहेत. एकूण ६८ कुटुंबे ‘तात्पुरते’ विस्थापित झाली आहेत.

चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने एका निवेदनात म्हटले आहे की, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत, हॉटेल माउंट व्ह्यू आणि मलारी इनला पुढील आदेशापर्यंत व्यवसाय आणि निवासासाठी बंदी घालण्यात आली आहे. जोशीमठ शहर क्षेत्रांतर्गत, 229 खोल्या तात्पुरत्या स्वरूपात राहण्यायोग्य म्हणून ओळखल्या गेल्या आहेत, त्यांची क्षमता अंदाजे 1271 आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 33 आणि 34 नुसार जीव आणि मालमत्तेच्या जोखमीचे मूल्यांकन केल्यानंतर, अतिप्रमाणात भूस्खलनाचा धोका असलेल्या आणि असुरक्षित समजल्या जाणार्‍या भागातून स्थानिकांना तातडीने बाहेर काढण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

दरम्यान, भूस्खलनामुळे बाधित ठिकाणे ओळखण्याचे काम प्रगतीपथावर आहे आणि असुरक्षित कुटुंबांना तात्पुरते सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच जिल्हा प्रशासनाने रविवारी पीडित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी आवश्यक सहाय्यता निधीचे वाटप केले. 46 बाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसाठी 5,000 रुपये प्रति कुटुंब या दराने निधी वितरित करण्यात आला आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

 

 

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

आज अहमदाबादमधील अपघातस्थळी प्रधानमंत्री यांनी भेट दिली.दृश्य हृदयद्रावक होते.बचाव व मदत कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची व टीमची भेट घेतली.ही दुर्घटना अकल्पनीय आहे.ज्यांनी आपले प्रियजन गमावले,त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन, गुणवंतांचा झाला गौरव

vishwatmaklokswamivarta

कायद्याचा धाक, प्रबोधनामुळे अमली पदार्थसंबंधी गुन्ह्यांना आळा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- अमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीत घेतला आढावा..

17वा रोजगार मेळावा: महाराष्ट्रातील 296 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण भारतीय टपाल विभागाकडून मुंबई, पुणे, नागपूरमध्ये मेळाव्याचे यशस्वी आयोजन

vishwatmaklokswamivarta

गरजू महिलांना रोजगारासाठी ‘पिंक ई रिक्षा’; पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta