vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

मकर संक्राति फल*

⛳ *मकर संक्राति फल* पौष कृष्ण सप्तमी शके १९३८. शनिवार १४ जानेवारी २०२३ रोजी रात्री ०८|४४ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे.

 

अध्यात्मिक वार्ता

*संक्रांतीचा पुण्यकाल*

*दि. १५|०१|२०२३ पर्यंत रविवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत संक्रातीचा पुण्यकाल आहे.*

⛳ *या दिवसाचे कर्तव्य*

तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिलहोम, तिलतर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग करावा.

⛳ *यावर्षी बालव करणांवर*

संक्रांत होत असल्याने उक्त असलेले

⛳ *वाहनादि प्रकार* वाहन वाघ असून,उपवाहन घोडा आहे.

⛳ *वस्र* देवीने पिवळे रंगाचे वस्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे.

⛳ वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाई घेतलेली आहे.

⛳पायस भक्षण करित आहे.

सर्प जाती आहे.

⛳ *भूषणार्थ* मोती रत्न धारण केलेला आहे.

⛳ *नावं* वारनाव राक्षसी असून नाक्षत्रनांव मंदाकिनी आहे. समुदाय मुहूर्त ३० आहेत.

 

⛳ *दिशा* देवी दक्षिण दिशेकडुन उत्तर दिशेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे.

⛳ *नियम* मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलु नये, वृक्ष-गवत तोडणे, गाईम्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत.

 

⛳ *संक्रांतिपर्वकाळात स्रियांनी करावयाची दानेः-*

नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमि, गाय, वस्र, घोडा इत्यादि यथाशक्ति दाने करावीत.

⛳ *संकल्प*

*देशकालोच्चार करून “मम आत्मनः सकल पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री सवितृ प्रीतिद्वारा सकलपापक्षयपूर्वकं स्थिर सौभाग्य कुलाभिवृध्दि धनधान्यसमृध्दि दीर्घायुः महैश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपादादि कल्पोक्त सिध्दये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले दानमहं करिष्ये. असा संकल्प करून जे दान द्यावयाचे ते द्यावे.*

⛳ *॥अथ जन्मर्क्षवशात्फल॥*

*पंथाः* – हस्त, चित्रा, स्वाती.

*भोगः* – विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा.

*व्यथा* श्रवण, धनिष्ठा, शततारका.

*वस्र* पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती, आश्विनी, भरणी, कृत्तिका.

*हानिः* रोहिणी, मृग, आर्द्रा.

*विपुलं धनम् ।* पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा.

 

⛳ *विशेष सुचना*

*दरवर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशाप्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.*

 

आपणांस व आपल्या परिवारांस मकरसंक्रांतिच्या शुभेच्छा.

 

*******************************

संबंधित पोस्ट

सोळा सोमवार व्रत माहिती

🔱 *श्री दुर्गासप्तशती कथासार* 🔱

*हे जगातील ७ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य का नाही??* 

vishwatmaklokswamivarta

भाऊबीजेच्या सणाची कथा*

vishwatmaklokswamivarta

श्री_शिवलिलामृत || मराठी अर्थ || अध्याय सातवा ||सुमेधा आणि सोमवंत, मदन आणि पिंगला, सुमती आणि भद्रायू

देवी तत्व —

vishwatmaklokswamivarta