
तेलंगना राज्यातील घटना:गॅस सिलिंडर स्फोट, आजीसह नातीचा मृत्यू..
तेलंगणा प्रतिनिधी
तेलंगणातील मेडक जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागून सहा वर्षांची मुलगी आणि तिची 60 वर्षीय आजी यांचा मृत्यू झाला.
तेलंगणातील मेडक जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन जण ठार झाले. पोलिसांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजी सिलिंडरच्या स्फोटामुळे घराला आग लागून सहा वर्षांची मुलगी आणि तिची 60 वर्षीय आजी यांचा मृत्यू झाला. मेडक जिल्ह्यातील चिन्ना शिवनूर गावात ही घटना घडली. अनूक्रमे मधू आणि अंजम्मा अशी मृतांची नावे आहेत. स्फोट झाल्याने आगीत घर पूर्णपणे जळून खाक झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये दोन मुलांसोबत राहणारी अंजम्मा मंगळवारी रेशन दुकानातून तांदूळ घेण्यासाठी आणि मासिक पेन्शन घेण्यासाठी तिच्या नातवासोबत गावी आली होती



