vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा साडेतीन शक्तिपीठे, नारीशक्ती; महाराष्ट्राच्या चित्ररथाचे लक्षवेधी पथसंचलन…

आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा साडेतीन शक्तिपीठे, नारीशक्ती; महाराष्ट्राच्या चित्ररथाचे लक्षवेधी पथसंचलन…

 

मुंबई प्रतिनिधी

 

आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात येते.

आज देशभरात ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने दिल्लीतील लाल किल्ल्यावरील कर्तव्यपथावर भारताच्या तिन्ही दलाच्या सैनिकांकडून शक्तिप्रदर्शन आणि पथसंचलन करण्यात येते. त्याचबरोबर देशातील विविध राज्याच्या चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात येते.२६ जानेवारीला दिल्ली कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात देशातील विविध राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात.यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र ‘नारीशक्तीचा जागर’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला. या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.या चित्ररथामध्ये देवीच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवण्यात आले असून नारीशक्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहुरची रेणुकादेवी आणि वणीची श्री सप्तश्रुंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे

त्याचबरोबर या चित्ररथात राज्यातील वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती, पोतराज, वारकरी, संबळ वादक यांचाही समावेश करण्यात आला आहे.यावेळचा महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्यपथावर लक्ष्यवेधी ठरला.

 

 

संबंधित पोस्ट

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक

आयआयटी मधील दलित विद्यार्थी आत्महत्येच्या सखोल चौकशीसाठी उद्या सोमवारी पवईत रिपब्लिकन पक्षाचे निर्देशने आंदोलन* 

vishwatmaklokswamivarta

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

गुजरात मध्ये बनावट दारू प्यायल्याने 15 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज प्रदान होणार महाराष्ट्र भूषण पुरस्कार; खारघर सज्ज…

vishwatmaklokswamivarta

राहुल गांधी मानहानी खटल्यातील शिक्षेला देणार गुजरात न्यायालयात आव्हान; प्रियंका गांधीही राहणार उपस्थित