
तुर्कस्तान, सीरिया भूकंपाचा 7 दशलक्षहून अधिक मुलांना फटका: संयुक्त राष्ट्र
विदेश प्रतिनिधी
तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये झालेल्या भयंकर भूकंपामध्ये हजारो नागरिकांचा बळी गेला. जीवित आणि वित्त हानी झाली. परंतू, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. संयुक्त राष्ट्रांनी माहिती देतना मंगळवारी (14 फेब्रुवारी) म्हटले की, तुर्कस्तान आणि सीरियामधील भूकंपामुळे 7 दशलक्षाहून अधिक मुले प्रभावित झाली आहेत.
तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये झालेल्या भयंकर भूकंपामध्ये हजारो नागरिकांचा बळी गेला. जीवित आणि वित्त हानी झाली. परंतू, याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला आहे. संयुक्त राष्ट्रांनी माहिती देतना मंगळवारी (14 फेब्रुवारी) म्हटले की, तुर्कस्तान आणि सीरियामधील भूकंपामुळे 7 दशलक्षाहून अधिक मुले प्रभावित झाली आहेत. यातील हजारो बालके मरण पावल्याचेही संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे
संयुक्त राष्ट्र बाल संस्था युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर यांनी जिनिव्हा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानमध्ये, दोन मोठ्या भूकंपांचा फटका बसलेल्या 10 प्रांतांमध्ये राहणार्या मुलांची एकूण संख्या 4.6 दशलक्ष इतकी होती. तर, सीरियामध्ये सुमारे, 2.5 दशलक्ष मुले बाधित आहेत
जेम्स एल्डर यांनी सांगितले आहे की, या भूकंपामध्ये हजारो मुलांचा मृत्यू झाल्याची भीती युनिसेफला वाटते आहे. अद्यापही मृत्यू झालेल्या मुलांचा नेमका आकडा पुढे आला नाही. दुर्दैवाने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची भीती जेम्स एल्डर यांनी व्यक्त केली आहे. आपत्तीजनक, आणि सतत वाढत जाणारी, मृत्यूची संख्या लक्षात घेता, ते म्हणाले की हे स्पष्ट आहे की “या विनाशकारी भूकंपात अनेक मुलांनी पालक गमावले असतील.



