
राज्यातील बारावी गणित पेपरफुटीप्रकरणाचा तपास ‘SIT’ कडे…
मंत्रालय प्रतिनिधी
अमरावती विभागाच्या सचिवांनी पत्रक काढून सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकात तात्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात 10वी, 12वी च्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. राज्यात काही ठिकाणी कॉपिमुक्त परीक्षा अभियानाचे तीन तेरा उडाल्याचं चित्र आहे. मागील आठवड्यात बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडीयात लीक झाल्याचं पहायला मिळालं आहेत. याप्रकरणी काही शिक्षक आणि विद्यार्थांवर कारवाई केल्यानंतर या पेपरफूटी प्रकरणाचा पुढील तपास आता SIT कडे देण्यात आला आहे. यामध्ये 7 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस ताब्यात असलेल्या 2 शिक्षकांना सध्या 10 मार्च पर्यंत पोलिस कोठडी देखील ठोठावण्यात आली आहे.
महाराष्ट्रात काही ठिकाणी सामुहिक कॉपीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे यंदा कोविड संकटानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घेऊन ती सुरळीत पार पाडण्याचं मोठं आवाहन बोर्डासमोर आहे. अशात आता 12वीच्या गणिताच्या पेपरचा काही भाग सोशल मीडीयात व्हॉट्सअॅप वर वायरल झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांची क्राईम ब्रांच या पेपरफूटी प्रकरणाच्या मागे लागलं होतं. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे.
अमरावती विभागाच्या सचिवांनी पत्रक काढून सिंदखेडराजा तालुक्यातील केंद्र क्रमांक 601 602 6060 609 या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकात तात्काळ बदल करून इतर शिक्षकांची नियुक्ती करावी व संबंधितांना आदेश निर्गमित करण्याचे आदेश दिले



