vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

मुंबईत सोन्या-चांदीच्या दरात घट;  आजचा भाव

 मुंबईत सोन्या-चांदीच्या दरात घट;  आजचा भाव

व्यावसायिक प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांपासून सर्व सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत गुंतवणूकदार सोने आणि चांदीकडे  महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे तुम्ही सोने चांदी खरेदीच्या विचारात असाल तर तुम्हाला त्यात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. कारण सोन्या चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज (शुक्रवार) रुपये 50,900 असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 51,00 रुपये प्रति तोळा होती. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55, 530 रुपये आहे. तर गुरुवारी हा दर 55,630 रुपये इतका होता.

 

महाराष्ट्रात सोन्याच्या दराची स्थिती काय?

 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोन्याच्या दरात केवळ शंभर रुपयांनी घट झाल्याची माहिती गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिली आहे. गुरुवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,630 रुपये होती. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम आजचा दर हा 55, 530 रुपये आहे. पुण्यातही 22 कॅरेट सोन्याचा दर 50,900 रुपये आहे. तर पुण्यात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55, 530 आहे. अमरावती, लातूर, कोल्हापूर, सोलापूर औरंगाबाद, अमरावती, नागपूरमध्ये दर हे वरीलप्रमाणेच आहेत. तर नाशिक, वसई-विरार आणि भिवंडीमध्ये 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 50,930 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 55,560 रुपये आहे.

 

चांदीचा भाव काय?

 

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार गुरुवारी एक किलो चांदी 65,550 रुपयेन विकली जात होती. तर शुक्रवारी हा दर 65,450 रुपये प्रति किलोने विकली जाईल. म्हणजेच एकूणच चांदीच्या दरात घट झाली आहे.

 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा आणि चांदीचा भाव

 

दिल्ली

22ct सोने : रु. 51050, 24ct सोने : रु. 55680, चांदीची किंमत: रु. 65450

 

मुंबई

22ct सोने : रु. 50900, 24ct सोने : रु. 55530, चांदीची किंमत : रु. 65450

 

कोलकाता

22ct सोने : रु. 50900, 24ct सोने : रु. 55530, चांदीची किंमत : रु. 65450

 

चेन्नई

22ct सोने : रु. 51550, 24ct सोने : रु. 56250, चांदीची किंमत: रु. 67400

 

हैदराबाद

22ct सोने : रु. 50900, 24ct सोने : रु. 55530, चांदीची किंमत : रु. 67400

 

बंगळुरु

22ct सोने : रु. 50950, 24ct सोने : रु. 55580, चांदीची किंमत: रु. 67400

 

अहमदाबाद (अहमदाबाद सोन्याची किंमत)

22ct सोने : रु. 50950, 24ct सोने : रु. 55580, चांदीची किंमत: रु. 65450

 

सूरत (सूरत सोन्याचा भाव)

22ct सोने : रु. 50950, 24ct सोने : रु. 55580, चांदीची किंमत: रु. 65450

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे वसतीगृह; विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये-19 डिसेंबर रोजी भरती मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत कंत्राटी पद्धतीने पदभरती

vishwatmaklokswamivarta

Motorola लवकरच भारतात आपला तगडा स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनची खास फीचर्स आणि डिझाइन तुम्हाला वेड लावेल. चला जाणून घेऊया या हटके फोनबद्दल…

सेलफोन रिपेअर अँड सर्व्हिस प्रशिक्षण संपन्न

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल