
काँग्रेस नेते राहुल गांधींच्या घरी पोहोचले दिल्ली पोलीस, महिलांच्या लैंगिक छळाच्या वक्तव्यावर दिली होती नोटीस….
नवी दिल्ली प्रतिनिधी
भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना यापूर्वी नोटीस पाठवली होती. यात्रेदरम्यान त्यांनी महिलांच्या लैंगिक छळाच्या वक्त व केले होते त्यानुसार सदर नोटीस देण्यात आलेली आहे
दिल्ली पोलिसांचे पथक काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले आहे. दिल्ली पोलिसांचे स्पेशल सीपी सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी दिलेल्या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना यापूर्वी नोटीस पाठवली होती. ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांची माहितीसाठी ही नोटीस पाठवली होती.



