vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 21वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 21वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे

क्रिकेट प्रतिनिधी

लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे.

 

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 21वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाने सलग दोन सामने जिंकून शानदार पुनरागमन केले आहे. पंजाब किंग्जसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्स संघाने निर्धारित 20 षटकात आठ गडी गमावून 159 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सच्या वतीने सलामीवीर केएल राहुलने वेगवान फलंदाजी करताना ७४ धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम करणने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. पंजाब किंग्जला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 160 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. हरप्रीत सिंग भाटिया 22 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 98/4.

 

संबंधित पोस्ट

गोव्याच्या पर्यटन विभागाने बजावली क्रिकेटपटू युवराज सिंग ला नोटीस, 8 डिसेंबरला हजर राहण्याचे दिले निर्देश…

vishwatmaklokswamivarta

सलग तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोहद कसाळेची विजयी भरारी; दुहेरी विजेतेपदांसह उपविजेतेपदेही पटकावली

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचे अचूक ‘लक्ष्‍यभेद’पॅरिस ऑलिंपिकमध्ये देशाला दुसरे कांस्यपदक क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिनंदन.

श्रीलंकेचा भारतावर 16 धावांनी विजय, सुर्यकुमार आणि अक्षरची खेळी ठरली अपयशी…

vishwatmaklokswamivarta

मी मॉड्रिक, मेस्सी, पेपे जगप्रसिद्ध आणि वर्ल्डकपविजेत्या खेळाडूचा फुटबॉलला अलविदा…

vishwatmaklokswamivarta

पिंक-बॉल कसोटीपूर्वी Rohit Sharma याला दिग्गज खेळाडूचा सल्ला, ‘हिटमॅन’ला त्याचा ट्रेडमार्क शॉट शॉट न खेळण्याचे केले आवाहन