vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

चीनमध्ये मोठी दुर्घटना; रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू…

चीनमध्ये मोठी दुर्घटना; रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू…

 

विदेश प्रतिनिधी

चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये हा अपघात झाला.

रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी 21 लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाच्या इमारतीला दुपारी 12:57 वाजता आग लागली.

त्याचवेळी चीनमध्ये आग लागण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमधील कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:04 वाजता ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

संबंधित पोस्ट

लंडन ब्रीज फायर व्हिडिओ व्हायरल: लंडन ब्रिजजवळ भीषण आग, रेल्वे वाहतूक विस्कळीत, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या दाखल

नेपाळमध्ये हिसक आंदोलन- नेपाळच्या प्रधानमंत्री के पी शर्मा ओली चा राजीनामा, हिंसक आंदोलनानंतर पायउतार; देश सोडला..

vishwatmaklokswamivarta

रविवारी महिलांचे चुंबन घ्यायला या देशात बंदी…!  

vishwatmaklokswamivarta

इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असून हिरो म्हणून उल्लेख केला आहे

vishwatmaklokswamivarta

तालिबानी देश: अफगाणिस्तानात तालिबानने कुटुंब आणि महिलांना ‘या’ ठिकाणी जाण्यास घातली बंदी

स्पेनच्या कॅनरी बेटांच्या मार्गावर प्रवासी बोट बुडाली; किमान 35 जणांचा मृत्यू झाल्याची भीती