vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

तालिबानी देश: अफगाणिस्तानात तालिबानने कुटुंब आणि महिलांना ‘या’ ठिकाणी जाण्यास घातली बंदी

तालिबानी देश: अफगाणिस्तानात तालिबानने कुटुंब आणि महिलांना ‘या’ ठिकाणी जाण्यास घातली बंदी..

 

विदेश प्रतिनिधी

अफगाणिस्तानात तालिबानचे (Taliban) सरकार आल्यापासून  नागरिकांवर अनेक प्रकारची बंधने घातली आहे. यावेळी तालिबानने हेरात प्रांतातील गार्डन रेस्टॉरंटमध्ये कुटुंब आणि महिलांना बंदी घातली आहे. 

अफगाणिस्तानात तालिबानचे (Taliban) सरकार आल्यापासून  नागरिकांवर अनेक प्रकारची बंधने घातली आहे. यावेळी तालिबानने हेरात प्रांतातील गार्डन रेस्टॉरंटमध्ये कुटुंब आणि महिलांना बंदी घातली आहे. धार्मिक विद्वान आणि काही लोकप्रतिनींधीच्या तक्रारीनंतर हे पाऊल उचलले असल्याचे तालिबानने सांगितले आहे,

मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला जातो, असे तालिबानला वाटते. यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन ही औषधे कोणत्याही परिस्थितीत वापरू नयेत, असा इशारा दिला होता. दुकानदारांनाही धमकावण्यात आले आहे, असे कोणत्याही गोळीची विक्री करू नये. मुस्लिम लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्याचे पाश्चात्य देशांचे षडयंत्र आहे. त्यामुळे तालिबानी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते.

मुलींच्या शिक्षणावर बंदी

अफगाणिस्तानमधील खासगी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या मुलींना विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली होती. या आदेशाचे पालन न करणाऱ्या विद्यापीठांवर कठोर कारवाई करण्याचेही सांगण्यात आले. याआधीही महिलांना उद्यानात जाण्यास आणि जिममध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महिलांच्या मीडियामध्ये काम करण्यावर बंदी

अफगाणिस्तानात तालिबान सरकारने शालेय शिक्षणाला फटका बसल्यानंतर माध्यम क्षेत्रातील महिलांवर अनेक निर्बंध लादले. तालिबानकडून मीडियाला स्पष्टपणे सांगण्यात आले की पुरुषांसोबत कोणतीही महिला अँकर शो होस्ट करणार नाही, तर कोणत्याही महिला पाहुण्याला शोमध्ये आमंत्रित केले जाणार नाही.

संबंधित पोस्ट

अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप; तब्बल 950 जणांचा मृत्यू, 610 जखमी

अमेरिकेत 6 वर्षीय विद्यार्थ्याचा शिक्षिकेवर ‘लक्ष्य’ करून गोळीबार; धक्कादायक घटना

तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या व्यस्त पादचारी मार्गावर बॉम्बस्फोट .

vishwatmaklokswamivarta

ब्रिटेनचे नवे पंतप्रधान? पुन्हा एकदा भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावाची चर्चा

vishwatmaklokswamivarta

अमेरिका:अफगाणिस्तान प्रमाणेच 19 वर्षांपुर्वी व्हिएतनाममधून काढला होता पळ, सोमालिया आणि क्युबामध्ये फिरवली होती पाठ

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा स्फोट