vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याची घोषणा केली..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याची घोषणा केली..

 

मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  अध्यक्ष शरद पवार  यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात भूकंप झाला. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या अवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी ही आज मंगळवारी  ही घोषणा केली.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात भूकंप झाला. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या अवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी ही आज मंगळवारी (2 मे 2020) ही घोषणा केली. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व घडामोडी घडल्या. कार्यकर्त्यांना धक्का बसला पदाधिकारी आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले. वायबी चव्हान सेंटरमध्ये भावूक वातावरण निर्माण झाले.

शरद पवार यांनी म्हटले की, प्रदीर्घ काळ सामाजिक जीवनात राहिल्यानंत आता कोठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेला निर्णय अनपेक्षीत होता. ज्याची राजकीय वर्तुळात यत्किंचीतही कल्पना नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांसह सर्वांनाच धक्का बसला.

शरद पवार यांनी निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांतून तीव्र प्रतिक्रिया आली. आपण आपला निर्णय बदलावा अन्यथा आपणही संघटनेतून राजीनामा देऊ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांचा नूर लक्षात येताच शरद पवार यांनीही सांगितले की, मी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन बाजूला होणार आहे. संघटनेतून नव्हे. मी पक्षातच सक्रीय राहणार आहे. शिवाय लवकरच आम्ही एक समिती नेमणार आहोत. ही समिती तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा, असे शरद पवार म्हणाले.

 

शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांना आश्रू अनावर झाले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे अशा नेत्यांना अश्रू अनावर झाेले.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा तुमचा निर्णय आम्ही मानायला तयार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी आमची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील म्हणाले

संबंधित पोस्ट

रांजणगावला घोड धरणावरून नवीन पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा-उपमुख्यमंत्री अजित पवार

दुर्गापूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

भारताचा क्रिकेट वीर विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; आयसीसीकडून ‘वनडे प्लेयर ऑफ द मॅच’ 2023 या पुरस्काराने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

अमेरिका-महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार अमेरिका व राज्यातील विद्यापीठांनी शिक्षक-विद्यार्थी तसेच सत्र देवाणघेवाण वाढवावे – राज्यपाल रमेश बैस

नारायण राणे  राज ठाकरेंना बाहेर का पडावं लागलं; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा – खासदार नारायण राणे

vishwatmaklokswamivarta