
राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारला कोणताही धोका नाही. केवळ बॅनरबाजी करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
सातारा प्रतिनिधी: राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप, शिवसेना युतीच्या सरकारला कोणताही धोका नाही. केवळ बॅनरबाजी करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. या माध्यमातून विरोधक राज्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहेत, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली.
कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही’शासकीय योजनांची जत्रा आणि शिवदूतांच्या नेमणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात शिंदे सरकारचे 16 आमदार अपात्र होणार असून, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. याबाबत क्षीरसागर म्हणाले, ‘‘असे काहीही नाही कोणीही बॅनर लावला म्हणून तो मुख्यमंत्री होत नाही.
शिंदे सरकार कालावधी पूर्ण करणार’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार कालावधी पूर्ण करणार आहे. पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजप युतीचेच सरकार येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
क्षीरसागरांनी अजित पवारांची उडवली खिल्ली’आमदार अपात्रेच्या निकालासंदर्भात क्षीरसागर म्हणाले, ‘‘हा सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारितील विषय आहे. त्यावर मी बोलू शकत नाही; पण निकाल आमच्याच बाजूने लागणार असा आमचा ठाम विश्वास आहे. आमच्या मांडणीत खरेपणा आहे. त्यामुळे खरेपणाला न्याय मिळणार हे निश्चित आहे.’’ अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ‘‘कालच महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा झाली. त्या सभेला अजित पवार उपस्थित होते. तिकडेही त्यांची उपस्थिती व इकडे भाजप प्रवेश असे होऊ शकत नाही.’’ एकाच वेळी विरोधक काय काय करतील? अशा शब्दात त्यांनी पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेची खिल्ली उडवली.
योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचविणारशासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व विभागांच्या योजना सर्वसामान्य जनतेला सांगणे. त्याचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोचवणे याकरिता मी साताऱ्यात आलो आहे, असे सांगून क्षीरसागर म्हणाले, ‘‘प्रत्येक शहरात, जिल्ह्यात, वॉर्ड तेथे शिवसैनिक आणि या योजनांच्या प्रसिद्धीसाठी शिवदूतांची नेमणूक करणे आदी कार्यक्रमाचे नियोजन आहे. याचा व्यापक प्रसार आणि प्रचारासाठी मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे.’’



