vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण! ग्रहण दोष टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर….

आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण! ग्रहण दोष टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर ….

 

विशेष अध्यात्मिक प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सूर्यग्रहणानंतर आज 5 मेच्या रात्री वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan) आहे. ग्र्हण ही अवकाशातील अगदी सामान्य घटना आहे. जगात खगोलप्रेमी अशा दुर्मिळ घटना पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण भारतामध्ये चित्र थोडं वेगळं आहे

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सूर्यग्रहणानंतर आज 5 मेच्या रात्री वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan) आहे. ग्र्हण ही अवकाशातील अगदी सामान्य घटना आहे. जगात खगोलप्रेमी अशा दुर्मिळ घटना पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण भारतामध्ये चित्र थोडं वेगळं आहे. भारतात ग्रहणाचा संबंध अनेक जण धार्मिक गोष्टींशी देखील लावतात. त्यामुळे ग्रहणाशी निगडीत काही समज- गैरसमज पाळले जातात. दरम्यान आजचं ग्रहण भारतात दिसणार नसल्याने या सार्‍या रीती भाती आज भारतात पाळल्या जाणार नाहीत. परंतु संभाव्य धोका टाळण्यासाठी काही कार्य ग्रहण संपल्यानंतर केले पाहिजे असे बहुतेक ज्योतिषी सुचवतात

ग्रहणानंतर काय करावं? 

चंद्रग्रहण संपताच आंघोळ करावी आणि त्यानंतर कोणतीही पांढरी वस्तू, वस्त्र, छत्री इत्यादी गरोदर स्त्रियांच्या हातून दान करा. यामुळे चंद्र दोष दूर होतो आणि जन्मलेल्या मुलावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

चंद्रग्रहणानंतर शिळे अन्न खाऊ नये. हे अन्न जनावरांना द्या. घरामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले दही, चीज इत्यादी असल्यास ते फेकण्याऐवजी ग्रहण सुरू होण्यापूर्वी त्यामध्ये तुळशीची पाने टाका.

जर तुमचा ग्रहणाच्या आध्यात्मिक परिणामावर विश्वास असेल तर ग्रहण संपल्यानंतर तुम्ही गंगा नदीत किंवा घरातील पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करा. यानंतर गंगाजल थोडं प्राशन करा. असे केल्याने ग्रहण दोष दूर होतो आणि गर्भात वाढणारे मूल सुरक्षित राहते.

चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेच घराभोवती गंगाजल शिंपडल्याने घरातील ग्रहणामुळे निर्माण होणारा नकारात्मक शक्तींचा प्रभाव संपतो. ग्रहण उशिरा पहाटे 1 वाजता संपणार असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घराची स्वच्छता करा.

ॐ ह्लीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभ

जिह्ववां कीलय बुद्धि विनाशय ह्लीं ॐ स्वाहा।। या मंत्राचा जप करा.

चंद्रग्रहणानंतर स्नान करून भगवान शिवाची पूजा केल्याने ग्रहणाचा प्रभाव लवकर संपतो. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध, चंदन, पांढरी फुले इत्यादी भगवान शंकराच्या आवडत्या वस्तू अर्पण करा आणि भगवान भोलेनाथाचे ध्यान करा.

चंद्रग्रहण संपल्यानंतर चंद्राला कच्चे दूध अर्पण करावे. तुम्ही पाण्यात पांढरी फुले घालून चंद्राला अर्घ्य देऊ शकता. यामुळे गर्भवती महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर राहू-केतूचा परिणाम होणार नाही.

आजचं चंद्रग्रहण रात्री 8.45 ला सुरू होणार असून सुमारे  1 वाजता संपणार आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुंबई, महाराष्ट्र लोकभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.    

vishwatmaklokswamivarta

आज पासून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

आदिवासी विकास विभाग:अनुसूचित जाती जमातीच्या जात, वैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर होणारआता जात प्रमाणपत्रांचे समितीमार्फत पुनर्विलोकन करता येईल..

प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिनाचे आयोजन👉 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

आज 14 ऑक्टोबर पोलीस पाटील पदभरती-2025 लेखी परिक्षेचा  निकाल..लेखी परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांच्या 15 ऑक्टोबर होणार मुलाखती

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील निर्यात प्रोत्साहनासाठी आयोजित,महाराष्ट्र निर्यात संमेलन 2024-25 संपन्न