
भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा विश्वचषकातील सामना नरेंद मोदी स्टेडियम अहमदाबादला होणार….
क्रिकेट प्रतिनिधी
भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे.
भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे. सात संघ (अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान) आधीच पात्र ठरले आहेत. वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे. तथापि, नागपूर, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, त्रिवेंद्रम, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदूर आणि धर्मशाला हे ठिकाणे आधीच शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनूसार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे



