vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प..

 मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प..

[ रायगड प्रतिनिधी

: डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद पडली होती.

 

परशुराम घाटाला पर्यायी मार्ग असणाऱ्या चिरणी आंबडस मार्गावर वाहतूक कोंडी झाली. मात्र पोलिसांनी आता वाहतूक सुरळीत केली आहे. तर परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे. या आलेल्या चिखलामुळे काही वाहने परशुराम घाटात मातीत अनेक वाहने रुतली होती. मात्र आता पाऊस थांबला असून माती बाजूला करण्याचं काम सुरु आहे.

संबंधित पोस्ट

इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 25 फेब्रुवारीला प्रवेश परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथील प्रेमी युगुलाचे धावत्या वाहनात अश्लिल कृत्य; व्हिडिओ व्हायरल.. सोशल मीडियावर.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा…

शहरातील नागरिकांनाही घरकूल ! प्रधानमंत्री आवास योजना २.०; ऑनलाईन नोंदणीची सुविधा..

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…