vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

नाशिकच येथील त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला.. तर.हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे’ असं या नव्या फलकात म्हटल आहे

नाशिकच येथील त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला.. तर.हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे’ असं या नव्या फलकात म्हटल आहे

 

नाशिक प्रतिनिधी

नाशिकचं त्रंबकेश्वर मंदिर प्रवेशावरुन सध्या महाराष्ट्रात वाद पेटला आहे. अज्ञात लोकांनी काही दिवसापूर्वी रात्री मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यामुळं या ठिकाणी बराच गोंधळ सुरु आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर आता मंदिराच्या प्रवेशद्वारावर नवा फलक लावण्यात आला आहे

नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू शिवाय मंदिरात जाण्यास सक्त म्हणायचा आदेश असताना सुद्धा काही लोकांनी जाणीवपूर्वक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला असता तेथे एस आय टी ची स्थापना करण्यात आली आहे यावर पुढील कारवाई सुरू असून

हिंदूंशिवाय मंदिरात जाण्यास सक्त मनाई आहे’ असं या नव्या फलकात म्हटल आहे. जुना फलक अस्पष्ट झाल्यानं हा नवा फलक लावण्यात अल्याचं सांगितलं जात आहे. मराठीसह इंग्रजी भाषेत हा फलक लावण्यात आला आहे. जुना बोर्ड हा भिंतीवर पेंट करण्यात आला होता. यामध्ये मराठीसह गुजराती आणि इंग्रजी भाषेत सूचना लिहिण्यात आली होती.

दरम्यान, त्र्यंबकेश्‍वरमध्ये धार्मिक वातावरणासोबत सर्वधर्मीयांमध्ये सलोख्याचे नातं आहे. एकमेकांच्या कार्यात सहभागी होण्याची इथं परंपरा आहे. सर्वांनी आपल्या परीनं सलोखा अबाधित राखावा, असं शांतता समितीच्या सदस्यांनी सांगितलं आहे. तसेच पाच आळीत कार्यक्रम असतो, या कार्यक्रमात निघणारी मिरवणूक मंदिरापुढे आल्यावर धूप दाखवली जाते. ही नवी प्रथा अथवा वेगळेपणा नाही, आम्ही सर्व देवतांना मानतो असं स्पष्टीकरणही समितीकडून देण्यात आलं आहे.

मुळातच, मिरवणूक काढणारे प्रसाद विकतात. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्त्रांची विक्री करतात. सगळ्या समाज आणि धर्मीयांचे इथं सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळं वेगळं काही घडलं असल्याचं वाटत असल्यास माफी मागतो, असंही समितीनं म्हटलं होतं.

 

संबंधित पोस्ट

दृष्यमान शाश्वत स्वच्छतेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील”कंपोस्ट खड्डा भरु, आपलं गाव स्वच्छ ठेवू मोहीम आज 1 मे पासून

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

vishwatmaklokswamivarta

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta

ना. छगन भुजबळ यांच्याशी चर्चेची तयारी.!डॉ. संजय लाखेपाटी ल राज्य समन्वयक सकळ मराठा समाज आणि  मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र

vishwatmaklokswamivarta

महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात– जिल्हाधिकारी किशन जावळे