
मावशीच्याच घरी घरफोडी करणाऱ्या चोरट्यास ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून अटक.
गुन्हे प्रतिनिधी
ठाणे शहरातील घरफोडी उघड करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी वेळोवेळी आदेश दिले होते त्यानुषंगाने ठाणे गुन्हे शाखेकडील मालमत्ता शोध पथकाकडून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनकडील घरफोडीच्या गुन्ह्याबद्दल तांत्रिक विश्लेषनाद्वारे व गोपनीय माहिती द्वारे समांतर तपास चालू होते व बातमीदारांच्या माहितीच्या आधारे तपास करून सदर आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली होती.
मालमत्ता गुन्हे कक्षा कडील पथकाकडून मुंब्रा पोलीस ठाणे गु र नं ६३०/२०२३ भा द वि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दाखल असून सदर गुन्ह्यात अज्ञात इसमाने ५,४०,०००/- रु किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घरफोडी करून चोरी केल्याने त्याबाबत समांतर तपास करत असताना, मोबाईलचे तांत्रिक विश्लेषनाद्वारे तसेच पो. हवा/३३७४ किशोर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने गुन्ह्यातील संशयित आरोपी इसमाचा शोध घेत असता नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी हा कौसा मुंब्रा बायपास ब्रिजचे जवळ गुन्ह्यातील मालमत्ता विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने नमूद ठिकाणी मिळालेल्या माहितीप्रमाणे सापळा रचून शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याची माहिती घेतली असता त्याचे नाव आरफीन अन्वर सय्यद ,वय २६ वर्षे राह – कोठारी बिल्डींग, रु. नं -०५, जीवनबाग, मुंब्रा असे सांगितले असून त्याचे अंगझडती मध्ये त्याच्या कडून गुन्ह्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल असा ३,३०,४५० /- रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूरस केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्याबाबत रीतसर पंचनामा कार्यवाही करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास मुद्देमालासह मुंब्रा पो. स्टे चे ताब्यात पुढील कार्यवाही कामी देण्यात आले आहे .
सदर कामगिरी पोलीस उपआयुक्त मा. शिवराज पाटील सा. (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त मा. राजकुमार डोंगरे सा. (शोध-०२, गुन्हे शाखा) यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आनंद रावराणे, सपोनि महेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील प्रधान, पोहवा/ किशोर भामरे, संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, सदन मुळे आणि महिला पोलीस अंमलदार आशा गोळे, यांनी केली.



