vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत 10 टक्के पाणी कपात..पाणी जपून वापरा….आजपासून पाणी कपात,मुंबईत 10 टक्के पाणी कपात…

मुंबईत 10 टक्के पाणी कपात..पाणी जपून वापरा….आजपासून पाणी कपात,मुंबईत 10 टक्के पाणी कपात…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा प्राप्त होत नाही तोपर्यंत पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे. तोपर्यंत पाणी कपात असल्याचे सांगितले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस चालू असताना देखील महामालिकेने आज पासून पाणी कपात असल्याचे जाहिर केले आहे. 1 जुलै म्हणजे आजपासून 10 टक्के पाणीकपात लागू होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मान्सून लांबणीवर गेल्यामुळे तलावाच्या साठ्यात फक्त 6.97 टक्के पाणी आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात येते काही दिवस पाणी कपात केले जाण्याचे सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे सर्वे जलाशय पाण्याच्या पातळीत वाढ होवू लागले आहे.

धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय जूनच्या शेवटच्या आठवडय़ात घेतला होता.राज्यात दुसरीकडे पाणी पुरवठा कमी झाला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या  मोडक सागर,वैतरणा,  मध्य वैतरणा, भातसा,तानसा, विहार, तुळशी या सातही धरणांत सध्या एक लाख 57 हजार 412 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. मागील चार दिवसांपासून चांगला पाऊस असल्याने मागच्या वर्षीपेक्षा पाणी साठा वाढला आहे. मुंबईत पाणीपुरवठा करताना यातील एक टक्के पाणीसाठा हा तीन दिवसासाठी पुरतो त्यामुळे जवळपास 26 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा सध्या शिल्लक आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचं राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारींची इच्छा…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त.

vishwatmaklokswamivarta

पुढील आढवड्यात कमी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

फिट इंडिया संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या पंढरपूर आवृत्ती 2025 मध्ये 5000 हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग;

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 महत्वकांक्षी योजना.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये किरकोळ दगडफेक..

vishwatmaklokswamivarta

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका मध्ये नट्टू काका’ हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक यांचे निधन झाले आहे. ते ७८ वर्षांचे होते.