
सोलापूर- दिल्ली के के एक्सप्रेसमध्ये शॉर्टसर्किट मुळे भडकली आग; चालक जखमी, प्रवासी सुखरूप…
राज्य प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा आज सोलापूर मध्ये केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे भडकली आज मात्र आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली
रेल्वेमध्ये आग लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. दरम्यान चालक या दुर्घटनेमध्ये जखमी झाला आहे.
आज सोलापूर मध्ये केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं अजून एक वृत्त समोर आलं आहे. सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्या गाडी क्रमांक 12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सकाळी सोलापूर जवळील मलिक पेठ येथे पावणे 9 च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. यामध्ये रेल्वे चालक भाजला आहे. तर प्रवासी सुखरूप आहेत. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली



