vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख,जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सप्तशृंगी येथील बस अपघातात मृत्युमुखी महिलेच्या वारसाला एसटी तर्फे दहा लाख,जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, प्रतिनिधी

: नाशिकमधील कळवण येथे सप्तशृंगी गड घाटात एस टी बसच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

खामगाव आगाराची बस सप्तशृंगी गडावरून आज सकाळी खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट ४०० फुट दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

 

जखमी प्रवाशांना वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.  पाच रुग्णांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

 

००००

 

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूआज म्हणजेच 22 जुलै रोजी अतिवृष्टीबाबत ऑरेंज अलर्ट जारी…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

लोकसभा निवडणूक : श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी घेतली  यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात कलागुणदर्शन स्पर्धांतील विजेत्या महिला व सेवाभावी संस्था सन्मान..

महाराष्ट्रातील 15 सरपंच स्वातंत्र्यदिनी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार 9 महिला सरपंचांचा समावेश