vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

आमच्यात कोणीही नाराज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ५० आमदार आमचे सर्व अधिकार हे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत शंभूराजे देसाई

आमच्यात कोणी नाराज नाही, आम्ही सर्व…’; अजित पवारांकडे अर्थ खातं गेल्यानंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया…

 

राज्य प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात खातेवाटपावरून बराच काळ चर्चा सुरू होत्या. अखेर शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप पार पडले. अजित पवारांनी अर्थखातं सोपवण्यात आलं आहे. यानंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड करत २ जुलै रोजी शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान यानंतर शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षात खातेवाटपावरून बराच काळ चर्चा सुरू होत्या. अखेर शुक्रवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप पार पडले. अजित पवारांनी अर्थखातं सोपवण्यात आलं आहे. यानंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मंत्रिमंडळ खातेवाटपाच्या चर्चांदरम्यान शिवसेना आमदारांचा अजित पवारांना अर्थखातं देण्याला विरोध होता अशा चर्चा सुरू होत्या. मात्र शेवटी अर्थखातं अजित पवारांना मिळाल यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसला इतरही काही महत्वाची खाती मिळीली, दरम्यान शिंदे गटातील नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेत कोणीही नाराज नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्यात कोणीही नाराज नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ५० आमदार आमचे सर्व अधिकार हे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे सगळ्यांना समावून घेऊन, समतोल राखून कोणीही नाराज राहणार नाहीत अशीच मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत भूमिका घेतील असेही शंभूराज देसाई म्हणाले.

संबंधित पोस्ट

रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार? लंडनमधील 18 कोटींच्या संपत्तीसंदर्भात ED थेट कोर्टात…

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची स्पष्ट भूमिका जाहीर-मराठा दलित मुस्लिम यांची युतीचा प्रयत्न..

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार — काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मुंबईत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

vishwatmaklokswamivarta

नवनीत राणांच्या ‘एमआरआय’चे फोटो व्हायरल

राज्यातील शिंदे-फडणवीस  यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारला कोणताही धोका नाही. केवळ बॅनरबाजी करून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर  यांनी केली.