
मुंबईच्या बांद्रा बंस्टॅन्ड येथील घटना सेल्फीच्या नादात महिलेचा मृत्यू, मुलांच्या डोळ्यादेखत आई वाहून गेली…
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवरील काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये मुलांच्या डोळ्यादेखत त्यांची आई पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे
मुंबईतील वांद्रे बँडस्टँडजवरील काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये मुलांच्या डोळ्यादेखत त्यांची आई पाण्यात वाहून गेल्याचे दिसत आहे. ज्योती सोनार असे या महिलेचे नाव आहे. मुले मम्मी. मम्मी म्हणत ओरडत असतानाच आईच्या सेल्फी काढण्याच्या मोहाने ही भयंकर दुर्घटना घडली. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक जोडपे वाहत्या पाण्यात मध्यभागी बसून फोटो काढत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्यांची मुलेही किनाऱ्यावर उभे राहून बाहेर येण्यासाठी आवाज देत असल्याचे दिसत आहेत. मात्र त्यांचा हा हलगर्जीपणाच त्यांना महागात पडला. काही वेळाने मागून येणारा पाण्याचा प्रवाह दोघांनाही पाडतो. ज्यामुळे ते दोघेही पाण्यात वाहून जातात.



