
सह्य शिवालय जंगम समाजाचा गुरुपौर्णिमा उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न…
आध्यात्मिक वार्ता
सह्य शिवालय जंगम समाज प्रगती मंडळ मुंबई
मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे साजरा होणारा गुरुपौर्णिमा उत्सव व विद्यार्थी गुणगौरव सोहळा सदगुरू श्री ष ब्र १०८ पद्मभास्कर डॉ नीळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांच्या दिव्य सानिध्यात रविवार दि. १६ जुलै २०२३ रोजी वरळी मुंबई येथे हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाला मुंबई व उपनगर तसेच ग्रामीण भागातून आलेले समाज बांधव, वीरशैव समाजातील विविध मंडळाचे पदाधिकारी, समाज बांधव, माता- भगिनी, युवा वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मुंबईतील वरळी विभागातील सन्मानीय आमदार श्री सुनिल शिंदे साहेब तसेच मंडळाचे माजी संस्थापकीय अध्यक्ष श्री एच बी जंगम साहेब, विद्यमान अध्यक्ष डॉ विजय स्वामी, माजी अध्यक्ष डी एच जंगम, माजी सेक्रेटरी रा सी जंगम व बी. डी. जंगम, विद्यमान उपाध्यक्ष अनाजी स्वामी, बाळासाहेब जंगम व आनंदा जंगम, ज्येष्ठ नागरिक शंकर जंगम गाळदेव, मंडळातील पुरुष, महिला पदाधिकारी व युवा या वेळी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली
सुस्वर गुरुभजन, शिवपाठ, स्वागत गीताने कार्यक्रमात रंगत आली.
सदगुरु द्यारेश्वर महाराज यांच्या अमृत हस्ते इयत्ता पहिली ते पदवीधर विद्यार्थांचा सत्कार करुन गौरवण्यात आले, यावेळी सदगुरूंनी उपस्थित गुरुभक्ताना व तरुणांना “धर्मो रक्षति रक्षितः” या उक्तीप्रमाणे धर्म व एकात्मतेचा संदेश दिला, ज्या समाजात युवकांची संख्या जास्त तो समाज जास्त बलवान असेही त्यानी सांगितले.
आमदार सुनिल शिंदे यांनी मंडळाला मार्गदर्शन करताना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, यावेळी समाजातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन सुद्धा लाभले
मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्मानीय डॉ विजय स्वामी यांनी उपस्थित समाज बांधवाना आगामी काळातील समाजाची ध्येयधोरणे याबद्दल मार्गदर्शन केले त्यावेळी ते म्हणाले समाजातील मुलांसाठी बाल संस्कार शिबिर, महिलांसाठी रुद्र मंडळ लवकरच सुरु करण्यात येईल तसेच युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळाचे सरचिटणीस जगन्नाथ जंगम यांनी केली
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रवक्ता एम एन जंगम यांनी केले
गुरूपाद्यपूजन मंडळाचे सचिव दिलीप जंगम व त्यांच्या सौभाग्यवती या दांपत्यांनी केले
संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य मा मू श्रीरंग स्वामी, ओमकार स्वामी, अजिंक्य स्वामी यांनी केले
कार्यक्रमाची पूर्व तयारी व देखरेख कार्याध्यक्ष सी के जंगम यांनी पाहिली
स्टेज व्यवस्था : खजिनदार संदीप जंगम, सदस्य महेश जंगम, प्रकाश जंगम, पांडुरंग जंगम
सजावट व पूजेची मांडणी : शंकर जंगम व गणपत जंगम,
समाज बांधवांची व विद्यार्थ्यांची नाव नोंदणी: रोशन जंगम, प्रवीण जंगम, गणेश जंगम, पांडुरंग जंगम
महाप्रसाद व्यवस्था: सुरेश जंगम व रवी जंगम, संभाजी जंगम, हेमंत जंगम, भरत जंगम यांनी पाहिली
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद जंगम व उपस्थित युवा वर्ग तसेच महिला मंडळाच्या लीला जंगम, कल्पना जंगम, श्रावणी जंगम, मनीषा जंगम, वैशाली जंगम,मीना जंगम, संगीता जंगम, अरूणा जंगम, सुरेखा जंगम, सविता जंगम, सीमा जंगम, दीपाली जंगम, पुष्पा जंगम व इतर सर्व महिला मंडळाचे सहकार्य लाभले
तसेच समाजातील बहुसंख्य दानशूर समाजबांधव, अन्नदाते, देणगीदार, हितचिंतक यांचे आर्थिक पाठबळ व कार्यक्रम यशस्वी व सुंदर करण्यात सहकार्य लाभले.



