
राज्यातील रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात NDRF च्या मदतीला श्वानपथक; पहा बचावकार्याची ताजी दृष्य…
रायगड प्रतिनिधी
आज गडावर श्वानपथकाच्या मदतीने कोणी मातीच्या ढिगार्याखाली अडकला असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रायगड मधील इर्शाळवाडी परिसरात दरड कोसळून आता 30 तासांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सलग दुसर्या दिवशी एनडीआरएफची टीम सध्या घटनास्थळी बचावकार्यात दाखल आहे. आज गडावर श्वानपथकाच्या मदतीने कोणी मातीच्या ढिगार्याखाली अडकला असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्याने सर्वत्र चिखल झालेल्या या भागात एनडीआरएफ प्रतिकुल परिस्थितीमध्ये मदत करत आहे.
रायगड मधील इर्शाळवाडी भागात दरड कोसळून मोठं नुकसान झालं आहे. गडाखालील एक गाव बेचिराख झालं आहे. दरम्यान यामध्ये मृतांचा आकडा 16 वर पोहचला आहे. मागील 24 तासांपासून या भागात बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम सध्या तैनात असून प्रतिकुल परिस्थितीमध्येही श्वान पथकाच्या मदतीने सध्या मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे



