vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी प्रशासन चौखा

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी प्रशासन चौखा

 

राज्य प्रतिनिधी

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी कळमना मार्केट परिसरात जय्यत तयारी केली जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन दक्ष आहे.कळमना मार्केटमधील व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायाला आजवर कोणतीही बाधा येऊ न देता जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या कामाची व्यवस्था व कामे पूर्ण करण्यावर भर दिला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज प्रत्यक्ष कळमना मार्केटला भेट देऊन व्यापाऱ्यांशी संवाद साधत मतमोजणी केंद्राच्या पाहणी व सुरक्षिततेचा आढावा घेतला. अप्पर जिल्हाधिकारी तथा रामटेक निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनूप खांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रविण महिरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

येत्या 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीत प्रारंभी पोस्टल बॅलेटची मतमोजणी होणार आहे. 500 बॅलेट पेपरसाठी एक टेबल याप्रमाणे 10 टेबल 10 अधिकारी राहणार आहेत. यावर सहाय्यक निवडणूक अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत

ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी नागपूर लोकसभेसाठी 120 टेबल व रामटेकसाठी 120 टेबल याप्रमाणे मतमोजणीची रचना करण्यात आली आहे. राजकीय प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया पाहता यावी , यादृष्टीनेही नियोजन केले आहे. दोन्ही लोकसभा मतदार संघासाठी एकूण सुमारे सहा हजार एवढे मनुष्यबळ कार्यरत राहील. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा यांच्या निरिक्षणाखाली ही प्रक्रिया पार पडेल.

संबंधित पोस्ट

विदर्भवासियांना मध्य रेल्वेकडून फेस्टीव्हल गिफ्ट, दिवाळी निमित्त चालवणार मुंबई नागपूर विशेष ट्रेन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई मनपातील कंत्राटी कामगारांचा,वेतन प्रश्न लवकर मार्गी लागेल- कामगार मंत्री आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शेणे येथे मेळावा संपन्न*

vishwatmaklokswamivarta

भाजपा नेते किरीट सोमय्या हल्ला  प्रकरण; माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाचे गुरुवारी उद्घाटन*मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते ७१ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान मल्याळम सुपरस्टार मोहनलाल ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने सन्मानित; मराठी चित्रपट ‘शामची आई’, ‘नाळ २’ आणि ‘जिप्सी’ चा गौरव

vishwatmaklokswamivarta