vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपा नेते किरीट सोमय्या हल्ला  प्रकरण; माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

भाजपा नेते किरीट सोमय्या हल्ला  प्रकरण; माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक

मुंबई प्रतिनिधी

खार पोलिस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्यास भेटायला गेले होते. तेव्हा आपल्यावर शिवसैनिकांनी हल्ला केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर सोमय्या यांनी वांद्रे पोलिसांत धाव घेत हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांच्यासह चार शिवसैनिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली. दरम्यान, आरोग्याच्या कारणास्तव त्यांचा जामीन मंजूर झाला असून सुटकाही करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली

 रात्री उशिरा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलिस ठाण्यात दाखल होताच शिवसैनिक आक्रमक झाले होते. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करीत त्यांच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. काच फुटल्यामुळे सोमय्या जखमी झाले होते. यावेळी खार पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्यांमध्ये माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे सर्वांच्या समोर होते. ते प्रतिनिधींना प्रतिक्रिया देत होते.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) खार पोलिस ठाण्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली होती. विक्रांत नौका घोट्याळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आली होती. यावेळी विश्वनाथ महाडेश्वर हे शिवसैनिकांसोबत तिथे उपस्थित होते. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना अटक केल्याची माहिती आहे. विश्वनाथ महाडेश्वर  यांच्यासोबत चार जणांना अटक  केल्याची माहिती खार पोलिसांनी दिली.

संबंधित पोस्ट

चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती चा दौरा…

vishwatmaklokswamivarta

मंत्रालयात आयोजित बचत गटांच्या प्रदर्शनाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचा जिल्हा दौरा…

नवाब मलिकांची एवढी क्षमता नाही, हे घाणेरडं राजकारण, हिंमत असेल तर ठाकरे-पवारांनी समोरासमोर उत्तर द्यावं, किरीट सोमय्या यांचे  खुले आव्हान.

vishwatmaklokswamivarta

केंद्र शासन दिव्यांगांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील – श्रीमती प्रतिमा भौमिक, केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी भरीव तरतूद  -केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड दिव्यांग नागरिकांना निशुल्क साहित्याचे वाटप

vishwatmaklokswamivarta