vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट तर मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसाचा रेड अलर्ट तर मराठवाड्यासह विदर्भात यलो अलर्ट…

 

राज्य प्रतिनिधी

राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे

राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पावसाने  हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे, तर कुठं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर  या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे

हवामान विभागाकडून  कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महााष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

सध्या मुंबईसह ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यात धरण परिसरात सुरु असलेल्या पावसानं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे.

 

संबंधित पोस्ट

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची न्यायालयीन कोठडी विशेष एनआयए न्यायालयानं ८ सप्टेंबरपर्यंत वाढवली

ईडीने मालमत्ता जप्त केल्यानंतर शिवसेनास खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया, ‘घाबरत नाही, तुम्हाला फाट्यावर मारतो’

vishwatmaklokswamivarta

१९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न झाला : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाकवी कालिदास नाट्यगृह येथे रक्षाबंधन उत्सवास मुख्यमंत्री यांची उपस्थिती;बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खासदार संजय राऊत यांना कोर्टाचा दणका, अटक वॉरंट जारी…

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तयारीचा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांनी घेतला आढावा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी पूर्ण करुन प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे -अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी

vishwatmaklokswamivarta