vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ठाणेतून मोठी खळबळजनक बातमी: महानगर पालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू…

 ठाणेतून मोठी खळबळजनक बातमी: महानगर पालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू…

 

ठाणे प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अंदोगोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. कळव्याच्या या रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉकटर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांनी आयुष्य गमावल्याचे समोर सूत्रांची माहिती

मृत पावलेल्या रुग्णांमध्ये 13 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

मात्र सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे.  जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे,  त्यामुळे अनेक दिवसांपासून हे रुग्णालय बंद आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

मुंबईमध्ये आज 1 मार्चपासून बेस्टच्या सुपर सेव्हर बस पास दरांमध्ये 5-10% सुधारणा; जाणून घ्या नवे दर

दाक्षिणात्य अभिनेता सूर्या आणि अजय देवगन यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

vishwatmaklokswamivarta

नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• नाशिक ई-बस एकात्मिक सुविधेचा प्रस्तावही तयार करा• रिंग रोड प्रकल्पातील रस्तेकामांचा आराखडा 10 दिवसांत पाठवा..

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियरॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण

दिल्लीतील प्रदुषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले…

vishwatmaklokswamivarta