vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई सांताक्रुज येथील जुहू चौपाटीवर जेलीफिशचा सहा जणांना दंश, मुंबई महापालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई सांताक्रुज येथील जुहू चौपाटीवर जेलीफिशचा सहा जणांना दंश, मुंबई महापालिकेचे काळजी घेण्याचे आवाहन…

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील जुहू चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेन केले आहे.  जेली फीश हे पायाला चिकटत असल्याने ते सहज काढता येत नाहीत. यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी फिरण्यासाठी जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे

मुंबईच्या जुहू चौपाटीवर (Mumbai Juhu Beach) जर तुम्ही फिरायला जात असाल तर सावधान कारण मागील आठवडाभरापासून जेलीफिश मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांना या जेलीफिश माशांनी दंश केल्याची (Jellyfish Attack)घटना घडली आहे. यामध्ये चार ते सहा वयोगटातील दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे

जुहू चौपटीवर सहा जणांना जेलीफिशने दंश केला. मेहताब शेख (20), दिक्षाद मेहता (5), मोहम्मद मसुरी (4), मेटवीश शेख (6), मोहम्मद राजौल्लाह (22) आणि आराथ्रीहा प्रमूह (25) अशी जेली फीश ने दश केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांवर मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात.  ब्ल्यू बॉटल जेलीफिश साधारणता विषारी असतात. ते एका निळ्या पिशवी सारखे दिसतात. त्यांच्या दंशाने माणसाला असह्य वेदना होतात. जेलफीशने दंश केल्यानंतर त्या ठिकाणी  बर्फ चोळावा आणि त्यानंतर त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा.

 

 

 

संबंधित पोस्ट

कारागृहावरील वाढत्या कैद्यांचा ताण होणार कमी विविध कारणांनी बंदिस्त असलेल्या कैद्यांच्या सुटकेचा मार्ग होणार मोकळा…

मुंबई कोकण सह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ आहे. मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये मतदान करण्यासाठी मतदार नोंदणीची अखेरची संधी..!सर्व पात्र मतदारांनी आपले नाव मतदारयादीमध्ये आहे किंवा नाही याची तपासणी करावी

vishwatmaklokswamivarta

कॅनडामधील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक केलेल्या हल्ल्याचा मी अतिशय तीव्र निषेध करतो. त्याच प्रकारे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांवर दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta

रोजगार हमी योजनेतून २५ लक्ष ५२ हजार मनुष्यदिन रोजगार निर्मिती-जिल्हाधिकारी संजय दैने मजुरांच्या स्थलांतरावर नियंत्रण १०९ अमृत सरोवर पुनरूज्जीवीत

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-2024; दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

vishwatmaklokswamivarta